मुंबई : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येणार आहे. ट्रम्प भारत दौऱ्यावर येण्याआधी त्यांची कार भारतात दाखल झाली आहे. ट्रम्प कोणत्याही देशात जातात तेव्हा त्यांच्याआधी कार देशात पोहोचते. ही कार जगातील सर्वात सुरक्षित अशी समजली जाते. राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर ट्रम्प यांच्यासाठी खास लिमोजिन कार तयार करण्यात आली आहे. अत्यंत सुरक्षित आणि खास सोयीसुविधांनी युक्त अशी ही कार आहे. जगातील इतर कोणत्याही राष्ट्रप्रमुखाकडे अशी कार नाही. या कारचे नाव द बीस्ट असं आहे.
खास तयार करून घेतलेली ही कार कमीत कमी 14 वाहनांच्या ताफ्यात असते. राष्ट्राध्यक्षांच्या गरजेनुसार ही कार तयार करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काही महिन्यांतच ही कार त्यांना दिली होती. त्यापूर्वी राष्ट्राध्यक्षांसाठी कॅडलक कारचा वापर केला जात होता.
बीस्ट कार बॉम्ब हल्ला, केमिकल अॅटॅक किंवा न्यूक्लिअर अॅटॅक प्रूफ आहे. सुरक्षेच्या दृष्टीने परिपूर्ण अशीच ही कार आहे. या कारचा प्रत्येक भाग सुरक्षेसाठी तत्पर सेवा देऊ शकतो असाच आहे. ट्रम्प यांच्या या गाडीचा चालकही स्पेशल असतो. तो पूर्ण कम्युनिकेशन सेंटरसुद्धा चालवू शकतो. या वाहनात जीपीएस सुविधा असते. ड्रायव्हर प्रशिक्षित कमांडो असतो. कोणत्याही परिस्थितीत कार चालवू शकतो. तसंच त्याची केबिन काचेपासून वेगळी असते.
कारमध्ये ट्रम्प यांच्यासह सात जणांची बसण्याची व्यवस्था आहे. तसेच प्रत्येक सीट ग्लास चेंबरच्या रुपात वेगवेगळी करता येते. या सीटच्या काचेचं बटण ट्रम्प यांच्याकडे असतं.
ट्रम्प यांची बैठक व्यवस्था खास असते. त्यांच्या शेजारी सॅटेलाइट फोन असतो. त्यावरून थेट पेंटागन आणि उपराष्ट्राध्यक्षांशी संवाद साधता येतो. तसंच पॅनिक बटण आणि ऑक्सिजन सप्लायचे बटणही असते. राष्ट्राध्यक्षांच्या बाजूचा दरवादा आठ इंचाच्या मोठ्या स्टील, अॅल्युमिनिअर, टिटेनियम आणि सिरेमिकचा तयार केलेला आहे.
कारची खिडकी आणि पुढची स्क्रीन ग्लासच्या पाच लेअर्सनी तयार झालेली असते. कारला असलेल्या खिडक्यांपैकी फक्त एकच खिडकी उघडता येते. ड्रायव्हरजवळची ही खिडकी फक्त तीन इंच उघडते. लिमोजिन कारमध्ये भऱण्यात येणाऱ्या इंधनासोबत स्पेशल फोम मिक्स केलं जातं. स्फोट होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जाते. याशिवाय गाडीमध्ये फायर फायटिंग, टिअर गॅस सिस्टिम, मशीन गन चेंबर, नाइट व्हिजन कॅमेरा आणि खास टायर असतात. कार पंक्जर झाली तरीही काहीच फरक पडत नाही आणि वेगावरही परिणाम होत नाही

अधिक वाचा  झुंज चे अध्यक्ष राजू हिरवे राष्ट्रीय युवा चेतना पुरस्काराने सन्मानित