न्यूयॉर्क: एका ११ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी १७ वर्षीय मुलाला अटक केली आहे. या मुलाने केलेल्या बलात्काराच्या संबंधातून अल्पवयीन मुलीने एका बाळाला जन्म दिला आहे. आरोपी युवकाने पोलिसांसमोर आपला गुन्हा कबूल केला आहे. पीडित मुलगी ही आरोपीची नात्यातील असल्याचे समजते.

आरोपी मुलाच्या वडिलांनी एका बाळाला घेऊन रुग्णालय गाठले होते. त्यावेळी हे नवजात बाळ आपल्या घराबाहेर कोणीतरी सोडले होते अशी माहिती डॉक्टरांना दिली. या नवजात बालकाला पाहून डॉक्टरही चक्रावले. हा बाळाची नाळ तशीच होती. हे बाळ नुकतंच जन्माला आल्याचा संशय डॉक्टरांना आला. बाळाची प्रकृतीही ठिक नसल्याची बाब डॉक्टरांच्या लक्षात आली. या बाळाचा जन्म बाथटब झाला असल्याचे हे डॉक्टरांना उशिरा समजले.

अधिक वाचा  ....मग शिवसेनेला बाळासाहेबांनी सडत ठेवले का? फडणवीस

पोलिसांना या प्रकरणाची माहिती समजल्यानंतर त्यांनी चौकशी सुरू केली. त्यानंतर आरोपीने केलेला दुष्कर्म पोलिसांना समजले. आरोपीने अल्पवयीन पीडितेवर शंभर वेळा बलात्कार केला असल्याची कबूली दिली. पीडितेवर आरोपीकडून आठवड्यातून दोनदा बलात्कार करण्यात येत होता. आरोपीच्या वडिलांनी मुलगा पीडितेवर बलात्कार करत असल्याची माहिती नसल्याचे सांगितले. त्याशिवाय पीडित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची माहिती नसल्याचे त्याने सांगितले.