पिंपरी-चिंचवड : ‘गेल्या २६ वर्षात कीर्तनात जे झाले नाही ते गेल्या आठ दिवसात झाले.’ असं निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी म्हटलं आहे. पिंपरी चिंचवडच्या मोशी इथं शिव जयंती निमित्त आयोजित कीर्तनामध्ये महाराज बोलत होते. ‘मी जे गेले २६ वर्ष बोलतोय तेच आता ही बोलतोय, पण माझ्या वाक्याचा विपर्यास केला गेला.’ असं इंदुरीकर महाराजांनी म्हटलं आहे. या कीर्तनाला प्रसार माध्यमांना परवानगी नाकारण्यात आली होती, एवढच नाही तर कोणत्याही प्रकारे चित्रीकरण करण्यास मनाई करण्यात आली होती.
इंदुरीकर महाराजांविरोधात नगरमध्ये तक्रार दाखल झाली असून उद्या तृप्ती देसाईही इंदूरीकरांविरोधात तक्रार द्यायला नगरमध्ये जाणार आहेत. इंदूरीकर महाराजांचा चाहता वर्ग मोठा आहे. पण एका वक्तव्यामुळे ते वादात सापडले आहेत. महाराजांच्या याच धड्याविरोधात आता अंनिसनं नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आहे.

अधिक वाचा  वारज्यातील वन संस्कृती जतनाचा अभिमानच वाटतो - खासदार चव्हाण