मुंबई : बेबो करिना कपूरची रॅम्पवरची अदा काही औरच असते. मुंबईत लॅकमे फॅशन वीकमध्ये ही सैफिना रॅम्पवर अवतरली आणि सगळ्यांच्याच नजरा तिच्याकडे वळल्या. करिनाचंही हे आवडतं डेस्टिटेशन आहे. त्यामुळे लॅक्मेमध्ये करिना आवर्जून हजेरी लावते. तिच्या फॅन्सना उत्सुकता असते ती प्रत्येकवेळी रॅम्पवॉकसाठी कोणता ड्रेस निवडते याची. बरेचदा करिनाचा हाच ड्रेसअप मग इतरही मॉडेल्स कॅरी करताना दिसतात हा आजवरचा अनुभव आहे.
फॅशन डिझायनर अमित अग्रवालने तयार केलेल्या खास ग्रीन कलरच्या गाऊनमध्ये करिनाने यावेळचा रॅम्प गाजवला. रॅम्पवरचा सहज वावर हेच करिनाचं खास वैशिष्ट्य आहे आणि तेच तिच्या चाहत्यांना दरवेळी घायाळ करणारं ठरतं…यावेळीही करिनाने असाच माहौल केला…

अधिक वाचा  सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होण्याची शक्यता - वर्षा गायकवाड