नवी दिल्ली : मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह इतर सहा आमदारांनी आज मंत्रिपदाची शपत घेतली. केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळात सर्वाधिक शिकलेले मंत्री आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वत: अभियंता आहेत. केजरीवाल यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, 1989 मध्ये त्यांनी आयआयटी खडगपूर येथून बीटेक (मेकॅनिकल इंजीनियरिंग) केले आहे.
तसेच मनीष सिसोदिया यांनी 1993 ला भारतीय विद्या भवन येथून पत्रकारितेचा डिप्लोमा केला आहे. तर कैलास गहलोत यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार 2002 साली त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी पदवी घेतली आहे.
सत्येंद्र जैन यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यानी 1991मध्ये भारतीय असोसिएट मेंबरशिप ऑफ इंडियन इंस्टिट्यूट ऑफ आर्किटेक्ट (बी. आर्च् च्या समकक्ष)केले आहे. दिल्ली सरकारमधील सर्वात तरुण मंत्री इमरान हुसेन यांना जामिया मिलिया इस्लामियाकडून विद्यापीठाने 2005 मध्ये बॅचलर ऑफ बिझिनेस स्टडीजची पदवी मिळालेली आहे. 1993 ला राजेंद्र पाल गौतम यांनी दिल्ली विद्यापीठातून एलएलबी केले आहे. तर गोपाल राय यांनी 1998 मध्ये लखनऊ विद्यापीठातून समाजशास्त्र विषयात एमए केले आहे.
आम आदमी पक्षाकडे 70 पैकी 62 जागा
दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणुकामध्ये 70 पैकी 62 जागा आम आदमी पक्षाला मिळाल्या आहेत. 8 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती तर, 11 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर झाला होता. या निकालांमध्ये आम आदमी पार्टीला (आप) सर्वाधिक 62 जागा मिळाल्या आहेत. तर भाजपला केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. देशातील सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या काँग्रेसला मात्र एकही जागा मिळाली नाही.

अधिक वाचा  राष्ट्रगीत सुरू अन् विराटचे ‘लाजिरवाण’ कृत्य; ”तू पाकिस्तानात जा!” सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया