मुंबई : ‘तुमच्यात हिंमत असेल तर पुन्हा निवडणूक लढू. आम्ही एकटे असलो तरी तुम्हा तिघांना पुरुन उरू,’ असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं आहे. आम्ही सरकार खाली खेचणार नाही, पण तुमची हिंमत असेल तर चला पुन्हा लोकांच्या कोर्टात, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या अधिवशेनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि महाविकास आघाडीतील इतर नेत्यांवर जोरदार टीका केली. ‘सावरकरांवर टीका करणाऱ्यांना हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेस्तनाबूत करायचे. मात्र आता सावकरांचा अपमान रोज काँग्रेस करत आहे. हिंमत असेल तर शिदोरी मासिकावर बंदी घाला,’ असं आव्हान देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.

अधिक वाचा  चक्क उपमुख्यमंत्र्यांचा नंबर वापरून धमकी; गुन्हा दाखल हे अटकेत