नोएडा : गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील कलौंदा गावातील क्लिनिक चालविणाऱ्या 50 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार करीत त्याच्या स्वत:च्या पोटच्या पोरानेच हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रामभूल यांचा दुसऱ्या मुलाची पत्नी लग्नानंतर त्याला सोडून गेली होती. त्याचे वडील म्हणजे रामभूल याबाबत कायम त्याला दुसणे देत. ज्यामुळे वैतागून आरोपीने पित्याची हत्या केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कलौंदा गावात रामभूल सिंह (50) कुटुंबात पत्नी व दोन मुलं अरुण व ललित एकत्र राहत होते. रामभूल सिंह क्लिनिक चालवून लोकांना छोट्या-मोठ्या आजारांसाठी औषध देत असत. रामभूल यांची पत्नी माहेरी एका लग्नासाठी गेली होती. शुक्रवारी रात्री मोठा मुलगा पत्नी व मुलांसोबत घराच्या गच्चीवर झोपला होता. तर लहान मुलगा ललित आणि रामभूल खाली वेगवेगळ्या खोलीत खाटेवर झोपले होते.
शनिवारी सकाळी जेव्हा मोठा मुलगा खाली आला तेव्हा वडिलांच्या खोलीचे दार उघडे होते. खाटेवर रामभूल सिंह यांचे शव रक्ताने माखलेल्या स्थितीत होते. लहान भाऊ घरात नव्हता. मोठ्या भावाने तातडीने पोलिसांना व परिसरातील लोकांना याची माहिती दिली. पोलिसांनी तेथे आल्यानंतर रामभूल यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. घरातून फरार छोटा मुलगा ललितला घोडी गावातून ताब्यात घेण्यात आलं. ललितसोबत चौकशी केल्यानंतर नेमकी बाब समोर आली.
वडिलांच्या औषधांमुळं आलं आहे नपुंसकत्व
डीसीपी राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, रामभूलचा मुलगा ललितसोबत केलेल्या चौकशीअंती त्यांच्या हत्येचा खुलासा झाला आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, विवाहानंतर पित्याने त्याला एक औषध दिलं होतं. त्यामुळे ललितला नपुंसकत्व आलं. त्यामुळे तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झाला होता. तो सातत्याने त्याच गोष्टीचा विचार करीत बसतं. त्याचे वडिल त्याला घरात बंद करुन ठेवतं. मोबाइलही देत नव्हते. शुक्रवारी रात्री 10 वाजतादेखील ललितने त्याच्या वडिलांशी भांडणं केलं. रात्री जेव्हा रामभूल झोपले तेव्हा ललितने घरातील धारदार हत्याराने त्यांच्या डोक्यावर वार करुन हत्या केली आणि घाबरुन तेथून निघून गेला.

अधिक वाचा  पुणे विद्यापीठाला ऑफलाईन परीक्षा घेता येणार राज्य शासनाची मान्यता