अॅपल आयफोनच्या किंमतीमुळे अनेकांना ते आवडत असूनही खरेदी करता येत नाही. मात्र, आता कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Apple iPhone 11 Pro, iPhone 11 आणि iPhone XR वर मोठी सूट दिली जात आहे. अॅमेझॉनवर सुरु असलेल्या अॅपल डेज सेलमध्ये 99 हजार 900 रुपयांचा फोन 93 हजार 900 रुपयांत मिळत आहे. म्हणजेच या फोनवर तब्बल 6 हजार रुपयांची सूट दिली जात आहे. अॅपल डेज सेल 11 ते 17 फेब्रुवारी दरम्यान सुरु आहे.
आयफोन एक्सआरच्या 64 जीबी इंटरनल मेमरी असलेल्या मॉडेलवर चक्क 32 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. 76 हजार 900 रुपयांचा हा फोन 44 हजार 900 रुपयांमध्ये मिळेल. जर याच मॉडेलचा 128 जीबी मेमरीच्या फोनवर 34 हजार रुपयांची सूट मिळेल. हा फोन 47 हजार रुपयांना मिळेल. याची मूळ किंमत 81 हजार 900 रुपये इतकी आहे.
फक्त एवढचं नाही तर आयसीआयसीआय आणि एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास तुम्हाला अतिरिक्त सूट मिळेल. iPhone 11 Pro आणि iPhone 11 एचडीएफसी बँकेच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 6 हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. तसेच iPhone XR हा फोन ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी केल्यास 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. याशिवाय ईएमआयची सुविधाही उपलब्ध आहे.
iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिझोल्युशन 2436×1125 पिक्सेल आहे. 64GB, 256GB आणि 512GB स्टोरेजसह उपलब्ध असलेल्या फोनमध्ये A13 बायोनिक चिपसेट आहे. iPhone 11 Pro मध्ये रिअर कॅमेरा सेटअप असून 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड, 12 मेगापिक्सल वाइड आणि 12 मेगापिक्सल टेलिफोटो लेन्स नाइट मोडसह मिळते. सप्टेंबर महिन्यात हा फोन लाँच करण्यात आला होता.

अधिक वाचा  तिरंगा गाडीवर लावण बेकायदेशीर; काय आहे नियम!