सॅमसंग कंपनीने गॅलेक्सी S20 ही नवी स्मार्टफोनची मालिका लाँच करण्यासोबतच Galaxy S10 मालिकेच्या किंमतीत कपात केली आहे. S10 मालिकेत गॅलेक्सी S10, गॅलेक्सी S10+ आणि गॅलेक्सी S10e हे तीन स्मार्टफोन्स येतात.
गॅलेक्सी S10 आणि S10+ च्या किंमतीत 12 हजार रुपये आणि गॅलेक्सी S10e च्या किंमतीत 8 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. नव्या किंमती ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लागू झाल्या आहेत. किंमतीत झालेल्या कपातीनंतर सॅमसंग गॅलेक्सी 10 च्या 128जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत 54 हजार 900 रुपये आणि 512जीबी स्टोरेज व्हर्जनची किंमत 59 हजार 900 रुपये झाली आहे. हा फोन 66 हजार 900 रुपयांच्या बेसिक किंमतीसह लाँच करण्यात आला होता.
तर, गॅलेक्सी S10+ च्या 128जीबी स्टोरेजची किंमत 73 हजार 900 रुपयांनी कमी होऊन 61 हजार 900 रुपये झाली आहे. याशिवाय गॅलेक्सी S10e या फोनच्या किंमतीतही 8000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. आता हा फोन 55 हजार 900 रुपयांऐवजी 47 हजार 900 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या गॅलेक्सी S20 मालिकेच्या फोनसाठी प्री-बुकिंगला सुरूवात झालीये. फोनची विक्री 6 मार्चपासून सुरू होईल. या मालिकेअंतर्गत कंपनीने Galaxy S20, Galaxy S20+ आणि Galaxy S20 Ultra हे तीन स्मार्टफोन लाँच केलेत. तिन्ही फोनमध्ये जवळपास सारखेच फीचर्स आहेत, पण कॅमेऱ्यामध्ये फरक आहे.

अधिक वाचा  कोरोनाच्या संकटामुळे सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द