दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर पक्षातील नेतेच आता पक्षाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. काँग्रेसकडे निवडणुकांसाठी चेहराच नसल्याचे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी मान्य केले आहे.
सिब्बल म्हणाले, “आमच्याकडे निवडणुकांसाठी लोकप्रिय नेत्याचा चेहराच नाही. पक्षातील हा एक कळीचा मुद्दा आहे. यामध्ये आम्ही लक्ष घालणार आहोत आणि लवकरच हा प्रश्न सोडवू.” राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. पवार म्हणाले होते, “दिल्लीकरांनी भाजपाला चांगलाच झटका दिला आहे. भाजपाची पराभवाची मालिका आता थांबणार नाही,” असेही पवार म्हणाले होते. “धार्मिक ध्रुवीकरण आणि समाजाच्या विभाजनाचं कार्ड भाजपाच्या मंत्र्यांकडून खेळण्यात आलं होतं. हे आता दिल्लीची आणि देशातील जनता चालू देणार नाही. याच प्रतिबिंब झारखंड आणि छत्तीसगडसारख्या राज्यांमध्येही दिसून आलं आहे,” असे सिब्बल यावेळी म्हणाले.

अधिक वाचा  पुरुषप्रधान रुढी, परंपरांना मोडीत काढत पंचकन्यांकडून वडिलांच्या पार्थिवाला खांदा!