मुंबई: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा चित्रपट ‘तान्हाजी: द अनसंग वॉरियर’ ची पाचव्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरू आहे. हा चित्रपट प्रदर्शित होऊन तब्बल पाच आठवडे उलटले आहेत, तरीही चित्रपटाची क्रेझ कमी झालेली नाही. परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. आतापर्यंत या चित्रपटानं २६९.२५ कोटींचा गल्ला जमवला आहे.
१० जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पाचव्या आठवड्यातही हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. चित्रपटाची घोडदौड अशीच सुरू राहिल्यास हा चित्रपट दंगल आणि पीके या चित्रपटांना मागं टाकेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
पाचव्या आठवड्याच्या पहिल्या शुक्रवारी ‘तान्हाजी’ चित्रपटानं १.१५ कोटींची कमाई केली तर शनिवारी २.७८ कोटींचा गल्ला जमवला. रविवारी या चित्रपटानं ३.४५ कोटींचा व्यावसाय केला होता. कमाई अशीच सुरू राहिल्यास चित्रपट लवकरच ३०० कोटींचा टप्पा पार करेल यात शंका नाही.
‘मलंग’ आणि ‘शिकारा’ या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ‘तान्हाजी’ च्या कमाईवर परिणाम होईलं असं वाटत होतं. परंतु या दोन्ही चित्रपटांनी प्रेक्षकांची निराशा केल्याचं पाहायला मिळालं.
‘तान्हाजी’ची कमाल; बॉक्स ऑफिसवर २०० कोटी पार
छत्रपती शिवाजी महाराजांचा वीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. अभिनेता अजय देवगण, काजोल, सैफ अली खान, शरद केळकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनुसार दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने ४७.२५ कोटी रुपयांची कमाई केली होती.

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले