पुणे – पुणे शहर जिल्हा हज कमिटीच्या वतीने अल्पसंख्यांक मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा शनिवारी (दि. 8 फेब्रुवारी) आझम एज्युकेशन कॅम्पस पुणे येथील डॉ. ए.आर. शेख असेंम्ब्ली हॉल येथे सकाळी 11 वाजता जाहीर सत्कार आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान डॉ. एन.वाय.काझी भूषवणार आहेत. तर हज कमिटी ऑफ इंडियाचे सदस्य शेख इब्राहीम भाईजान आणि पिंपरी चिंचवडचे माजी महापौर आझमभाई पानसरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रक सय्यद रियाज इस्माईल (काझी), सय्यद इस्माईल (भाईजान काझी), मोहम्मद सईद खान यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

अधिक वाचा  सर्व मंत्रालयांच्या महत्त्वाच्या बैठकीत स्मार्टवॉच आणि स्मार्टफोनवर बंदी

या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन हज कमिटीचे सदस्य सिद्धीबिलाल महंमद, सय्यद मोहंमद रफीक, हसन अहेमद शेख, सय्यद उस्मान, सय्यद मन्सुर रियाज, महेबुब शेख, मुन्तखब शेख, इस्हाक मोहिद्दीन पटेल, इद्रीस नाथानी उर्फ खालु, सय्यद मुनाफ मक्बुल, मोहमंद हुसेन बागबान, शाहिद साबिर शेख, ईमतियाज शिकीलकर, अदिम गुडाकुवाला, सय्यद मोहंमद रफीक, युसूप अ.रज्जाक कुरेशी, नौशाद शेख, हबिब शेख यांनी केले आहे.