भंडारा: भागवत कथेच्या माध्यमातून आठवडाभर नैतिकेच्या कथा सांगणाऱ्या महाराजाने सप्ताह आटोपताच चक्क गावातील एका विवाहितेला घेऊन पलायन केल्याची घटना घडली. भागवत सप्ताहात या महाराजाने सदर विवाहितेला आपल्या मोहपाशात अडकवले. भंडाराजवळच्या मोहदूरा येथे उघडकीस आलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांच्या मदतीने पती महाराज आणि पत्नीचा शोध घेत आहे.

भंडाराजवळच्या मोहदूरा येथे दरवर्षीप्रमाणे भागवत सप्ताह कथाचे आयोजन २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत करण्यात आले होते. दरवर्षी कथावाचन करणाऱ्या दिनेश मोहतुरे महाराजांना आमंत्रित करण्यात आले. कथा सप्ताहात महाराजांनी आपल्या रसाळ वाणीने गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. अशातच त्यांची नजर भागवतातील एका विवाहितेवर गेली. तिच्या कुटुंबियांशी जवळीक साधली. महाराजांचे या काळात घरी येणे-जाणे सुरू झाले. कथावाचक महाराज घरी येत असल्याने कुणाला संशयही आला नाही. यानंतर महाराजांनी विवाहितेला मोहपाशात अडकवण्याचा प्रयत्न केला. त्यात ते यशस्वी ठरले.

अधिक वाचा  एका आयटम नंबरसाठी तब्बल एवढे मानधन घेतात या अभिनेत्री

३ फेब्रुवारीला भागवत सप्ताहाचा समारोप झाला. मात्र बुधवारी सायंकाळी महाराज सदर विवाहितेला घेऊन गावातून पळाले. विवाहिता घरी नसल्याची माहिती होताच शोधाशोध सुरू झाली. महाराजांशी एक दोनदा मोबाईलवर बोलताना सदर विवाहिता आढळल्याने घरच्यांचा संशय बळावला. सदर विवाहितेला पाच वर्षांची मुलगीही आहे. महाराजांचेच हे कृत्य असावे, असा संशय कुटुंबीयांना आला. यानंतर भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोलिसांना सोबत घेऊन सदर विवाहितेच्या पतीने सावनेर तालुक्यातील कुबडा गाव गाठले. मात्र महाराज गावात पोहोचलेच नव्हते. शोधाशोध सुरू असून सदर महाराज वृंदावनला असल्याची खात्रीलायक माहिती कुटुंबियांना मिळाली. पोलीस मोबाईल लोकेशनवरून ठाणेदार सुधारक चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस बबलू शहारे या महाराजाचा शोध घेत आहे.

अधिक वाचा  पुण्यातील 'या' बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची वाढली व्याप्ती, धक्कादायक बाब समोर

महाराज तीन बायकांचा दादला
आपल्या वक्तृत्व शैलीने सर्वांना भुरळ घालणारा महाराज तीन बायकांचा दादला असल्याचे पुढे आले. मात्र महाराजांच्या स्त्रीलंपट स्वभावामुळे एकही पत्नी त्याच्यासोबत राहत नाही. त्यामुळे आता त्याने चौथ्या महिलेला पळवून नेले. विशेष म्हणजे महाराज सोशल मीडियावरही अ‍ॅक्टिव्ह राहतात आणि कुणी व्हॉट्सअ‍ॅपवर साधे निमंत्रण पाठविले तरी हजर राहतात. आता गावातीलच विवाहितेला पळवून नेल्याने महाराजांवरील विश्वास मात्र उडाला.