मुंबई – हिंगणघाट पाठोपाठ राज्यात महिलांविरोधात गुन्हे घडण्यात वाढच दिसत आहे. कालच माटुंगा रेल्वे स्थानकाच्या पुलावर एका विकृतीने तरुणीची चुंबन घेत विनयभंग केल्याची घटना ताजी असताना अभिनेत्री मानसी नाईक रांजणगावला एका वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आली असता तिच्यासोबत छेडछाड झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवशी ही छेडछाड झाल्याचं मानसीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.

मानसी नाईक यांनी साकीनाका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तिच्यासोबत घडलेल्या गैरकृत्याप्रकरणी मानसी नाईक यांच्याकडून मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अभिनेत्री मानासी नाईक ५ फेब्रुवारीला शिरूर तालुक्‍यातील रांजणगाव येथे संध्याकाळी युवासेना जिल्हा प्रमुखाच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स करत असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्याशी गैरकृत्य केले. मानसी नाईक यांच्याकडून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साकीनाका पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत पुढील तपासासाठी रांजणगाव पोलिसांकडे गुन्हा वर्ग केला आहे. या तिघांविरोधात भा. दं. वि.३५४ आणि ५०६ साकीनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  शिक्षकांचे प्रशिक्षण आता शुल्क आकारूनच ; राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेने केले स्पष्ट