हडपसर : महाराष्ट्रामध्ये महिलांच्या संदर्भात अनेक समस्या निर्माण होत आहेत. महिलांच्या अन्याय-अत्याचार यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.एकीकडे केंद्र सरकार ‘ बेटी बचाओ, बेटी पढाओ ‘ असा नारा देत असताना त्यामध्ये बदल करून “अपने बेटे को भी समजाओ” असा नारा देण्याची गरज निर्माण झाली आहे .असे मत, भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी व्यक्त केले.
परीवर्तन शिक्षण संस्थेच्या वतीने वतीने ‘शोभाई अनाथालय ‘ चे उद्घाघाटन तृप्ती देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात व्यासपीठावर परिवर्तन शिक्षण संस्था संस्थापक शोभा लगड, होळकरवाडी सरपंच प्रज्ञाताई झांबरे, उपसरपंच दत्ता होळकर, अर्थविश्लेषक प्रभाकर कोंढाळकर, संभाजी ब्रिगेडचे उत्तम कामठे, शिवप्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास आवारी, ज्योतिबा नरवडे, प्राचार्य छाया दळवी, परिवर्तन शिक्षण संस्था सचिव महेश टेळे, उपाध्यक्ष मसूद शेख, श्रद्धा झांबरे, उद्योजक अतुल येवले, लता साखरे, सोमनाथ चव्हाण, संजय सातव, डॉ.चंद्रकांत बारमुख आदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या की, ” आज शिक्षणाने पिढी सुशिक्षित होत आहे. परंतु , संस्काराने विचारहीन झाली आहे. स्त्रीभ्रूण हत्याच्या प्रमाणामध्ये सर्वात जास्त शिक्षण घेणारी आधुनिक पिढीच आहे हे नाकारून चालणार नाही . मुलीच्या जन्माचे स्वागत आज अनेक भागात केले जात नाही. जी मुलगी माहेर आणि सासर दोन्ही प्रभावीपणे संभाळते तिचे जन्माचे स्वागत करताना अनेकांना कमीपणा वाटतो. मुलाच्या जन्मासाठी अट्टाहास धरणारे आपले मुले डॉक्टर, इंजिनिअर केले अशा उच्चशिक्षित नागरिकांचे आई-वडील अनाथालय मध्ये आहेत. परंतु , जगाला पोसणार आणि स्वतः उपाशी राहून आपल्या काळ्याआईच्या सेवेबरोबरच जन्म देणाऱ्या आई वडिलांची सेवा करत काबाडकष्ट करणारा शेतकरी आयुष्यभर सांभाळ करतो. तर मग खरा शिक्षित कोण कोण?असा प्रश्न उपस्थित केला. आज विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरात अनाथालय आणि वृद्धाश्रम मोठ्या प्रमाणात उभे करून काळाची गरज होत आहेत.यावेळी मानसी झांबरे, प्रमोद सावंत, शैला झांबरे, यांनीही मनोगत व्यक्त केले.
रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या शाहीन शेख यांचा विषेश सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश टेळे यांनी केले आभार मसूद शेख यांनी मानले. नीलम सेंडकर,सुभाष थिटे,रोहिदास लगड,सुशील येबाजी यांनी कार्यक्रमसाठी परिश्रम घेतले. कार्यक्रमला मोठ्या संख्येने नागरिक महिलांची उपस्थिती होती.

अधिक वाचा  शाळेत पोर नाही...चक्क गुरुजींच भिडले; शिक्षकाचा अंगठा मुख्याध्यापकाने चावला

*फोटो* : “शोभाई अनाथालय” चे उद्घाघाटन करताना भुमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई सोबत शोभा लगड, महेश टेळे, सरपंच प्रज्ञा झांबरे, नीलम शेंडकर आदी