आळंदी देवाची (दिनेश कुर्‍हाडे) : आळंदी मधील सामाजिक कार्यकर्ते आणि जय गणेश ग्रुपचे सदस्य चारुदत्त प्रसादे यांची भारतीय जनता पक्षाच्या आळंदी शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली .नियुक्तीचे पत्र भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी आळंदी शहर भाजपचे अध्यक्ष किरण येळवंडे, कार्याध्यक्ष बंडु नाना काळे, नगरसेवक पांडुरंग वहिले, सागर भोसले, माऊली रायकर, ओबीसी संघटनेचे अध्यक्ष माऊली बनसोडे, सचिन सोळंकर, प्रितम किर्वे, आकाश जोशी, भागवत काटकर, सदाशिव साखरे, राहुल घोलप आदि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आळंदी शहाराच्या विकासासाठी चारुदत्त प्रसादे कायम आघाडीवर आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्ननावर ते कायम आवाज उठवित असतात. गेली काही वर्षे भारतीय जनता पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे त्यांची सार्थ निवड झाली अशी चर्चा भाजपा कार्यकर्ते आणि परिसरात आहे. शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर आता पक्षाची ध्येय-धोरण , केंद्र सरकारच्या विविध योजना आदी सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी ते प्रयत्नशील असणार आहेत. आळंदी शहरातील जास्तीत जास्त युवक भाजपशी जोडला जाईल असे नवनिर्वाचित उपाध्यक्ष चारुदत्त प्रसादे यांनी न्युजमेकर.लाईव्ह च्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले .
खासदार गिरीश बापट, माजी राज्यमंत्री संजय भेगडे,भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष अतुल देशमुख, आळंदी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले,नगरसेवक प्रशांत कुर्‍हाडे, उद्योगपती चेतन नाना कुर्‍हाडे त्यांचे अभिनंदन करून भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  तिरंगा गाडीवर लावण बेकायदेशीर; काय आहे नियम!