आळंदी देवाची : आळंदी शहरालगत असणार्‍या केळगाव रोड वरील एका अल्पवयीन ४ वर्षाच्या मुलीवर एका अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्याची घटना दुपारी ३ ते ४ दरम्यान घडली .मुलगी घराखाली खेळत असताना शेजारीच राहणार्‍या एका अल्पवयीन मुलाने तिला मोबाईल खेळायला देतो असे सांगून घरात नेले ,आणि तिच्या वर बलात्कार करून तो तिथून पळून गेला . सदर प्रकरणी मुलीच्या आईने पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आरोपीला १२ तासात पकडण्यात आळंदी पोलिसांना यश आले आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक वाचा  106 नगरपंचायंती Election: विजयाचा गुलाल कुणाला?; मंत्र्यांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला