पुणे : स्व.अर्जुनराव बनकर प्रतिष्ठाण, सातव प्रतिष्ठाण,इंदूबाई वाडकर प्रतिष्ठाण, जन गर्जना मंच च्या वतीने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या ३५० व्या स्मृतिदिनानिमित्त गांधी चौक,हडपसर येथे साजरी करण्यात आला.तानाजी मालुसरे यांचे वंशज सुधाकर मालुसरे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी विठ्ठल सातव,सतीश भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी पुणे महानगरपालिकेत तानाजी मालुसरे यांचे तैलचित्र बसवावे व महापालिकेतर्फे जन्मदिवस व स्मृतिदिन साजरा करण्यात यावा,तसेच महाराष्ट्र शासनाने तानाजी मालुसरे यांचा शासकीय फोटो प्रकाशित करावा अशी मागणी महेंद्र बनकर व मुकेश वाडकर यांनी सर्व संस्थांच्या वतीने केली.
यावेळी महेश टेळे, हनुमंत मोटे, विवेक तुपे,संजय शिंदे,मोहन चिंचकर,विनोद करपे,छाबाजी येवले,हनुमंत पांढरे,महादेव वाघमोडे,मीना थोरात ,सविता हिंगणे,विशाल तोडकर,भाऊ माकर, भागूजी शिखरे,अमित गायकवाड,संजय सपकाळ,चिक्या फडतरे,तानाजी हिंगमीरे,प्रशांत पोमन,सचिन शेवाळे,शंकर डफळ,राजू ओरसे,हरीश नवले,रतन हिंगणे,राजेंद्र नेवसे,रणजित चव्हाण,बाबू नामबीयर,जयदीप फुले सोमनाथ गायकवाड,चंद्रकांत ताजने,अजय शिंदे,हनुदादा जाधव,विनीत थोरात,राजेश कांबळे,आदी नागरिक उपस्थित होते.
प्रास्तविक मुकेश वाडकर यांनी केले आणि महेंद्र बनकर यांनी आभार मानले.

अधिक वाचा  विजय मल्ल्याला लंडन उच्च न्यायालयाने आलिशान घरातून केले बेघर