पुणे : शासनाच्या विविध योजना विद्यार्थी सुदृढतेसाठी कार्यान्वित आहेत, शाळा-महाविद्यालयांनी त्याचा फायदा घ्यावा, विद्यार्थी सुदृढ झाला पाहिजे खेलो इंडियात या वर्षी महाराष्ट्रला २५६ पदके मिळालीत यामध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या खेळाडूचा सुद्धा वाटा आहे असे विजय संतान उपसंचालक , क्रीडा व युवकसेवा संचनालय यांनी मामासाहेब मोहोळ महाविद्यालयात खेळाडूचा मार्गदर्शन करताना सांगितले.

वार्षिक पारितोषिक वितरण समारंभास संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, खजिनदार ऍड मोहनराव देशमुख, पार्श्वगायक संदीप उबाळे, कॉमेडी अभिनेता आशुतोष वाडेकर, अभिनेत्री देवयानी मोरे, प्राचार्य डॉ. बाळकृष्ण झावरे उपस्थितीत होते. प्राचार्य डॉ. झावरे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाचे शैक्षणिक, क्रीडा, अध्यापक नैपुण्यबरोबर, विद्यापीठाच्या विविध योजनासह सेमिनार, नँकची माहिती देऊन महाविद्यालयाचा प्रगतीची माहिती दिली. संस्था खजिनदार ऍड मोहनराव देशमुख यांनी मागील पाच वर्षात महाविद्यालयाची प्रगती, डॉ. झावरे यांच्या कामाचा चढता आलेख सांगत बक्षीसपात्र विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या, उपसंचालक संतान यांनी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध शाळा महाविद्यालयात क्रीडा साहित्य, व्यायामशाळा उभारणीची मागणी केली. पार्श्वगायक उबाळे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी सिरीयलचे टायटल सॉंग गाऊन विद्यार्थी व उपस्थितांची मने जिकली, तर कॉमेडिकिंगचे आशुतोष वाडकर व देवयानी मोरे यांनी कॉमेडीबुलेट मधील चुटके सांगून उपस्थिताची मने जिंकली. मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा, कल्चर, सेमिनार, एक्सझिबिशन, वक्तृत्व, लीगलसेलमधील १३८ यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. यावर्षी वरीष्ठ-कनिष्ठ महाविद्यालयातील ८ विद्यापीठ, ९ राज्य-राष्ट्रीय, २४ जिल्हा व संस्थास्तरावर यश संपादन केलेल्या खेळाडूंना गैरवण्यात आले. महाविद्यालयातील ९ अध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे छानदार नियोजन प्रा.अनिल दाहोत्रे व डॉ. योगेश पवार, डॉ. नीता कांबळे प्रा.लक्ष्मण उकिरडे, अधीक्षक हरी सोळंकी यांनी केले.डॉ. आदिनाथ पाठक यांनी आभार तर डॉ. राणे,प्रा. पोखलेकर व प्रा.तारू यांनी सूत्रसंचालन केले.

अधिक वाचा  अमृता फडणवीस यांनी काव्यशैलीत नाना पटोले यांना लगावला टोला

व्होकेशनलच्या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या इलेक्ट्रॉनिक कारचे विशेष कौतुक मान्यवरांकडून करण्यात आले.
संदीप उबाळे, पार्श्वगायक, स्वराज्य रक्षक संभाजी टायटल सॉंग फेम यांचे कडून वार्षिक पारितोषिक समारंभात गायन करून विद्यार्थ्यांची व्हा व्हा मिळवली.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मामासाहेब मोहोळ महाविद्यालयकडून शैक्षणिक वर्ष 2019-20 करिता देण्यात येणारा Award of Academic Excellence मा. विजय संतान, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांचे हस्ते संस्था खजिनदार ऍड मोहनराव देशमुख, प्राचार्य डॉ बाळकृष्ण झावरे, गायक संदीप उबाळे, कॉमेडीफेम आशुतोष वाडकर, देवयानी मोरे उपस्थितीतीत मिळाला