आळंदी देवाची (दिनेश कुर्‍हाडे) : सद्गुरू रामदासबाबा कबीर मठ स्थापन करून वारकरी तत्वज्ञान आणि अध्यात्मची परंपरा अखंडपणे सुरू ठेवत राज्यभर पोहोचवण्यासाठी सामाजिक बांधिलकी आपल्या कृतीतून सिद्ध करणारे,अनेक संस्थांचे मार्गदर्शक,सकारात्मक कामाचे पाठीराखे, प्रबोधनकार, अभ्यासू व्यक्तिमत्व ह.भ.प.श्री. चैतन्य महाराज कबीर बुवा यांना खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा २०२० चा खेड तालुका गौरव पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला.
यावेळी खेड तालुका विद्या विकास प्रतिष्ठान मुख्य संयोजक तथा जि.प.सदस्य शरद बुट्टे पाटील, सचिव कैलास टाकळकर,उपसचिव ईसाक मुलाणी,आत्माराम शास्त्री महाराज, उपसभापती ज्योतीताई अरगडे,संजय घुंडरे पाटील,अमृतनाना शेवकरी,काळूराम पिंजन,संजय रौंधल,सुनील देवकर आदी मान्यवर उपस्थित होते.
ह.भ.प. चैतन्य महाराज कबीरबुवा हे माजी आमदार ह.भ.प.पंढरीनाथ कबीरबुवा यांचे नातू असुन गेली अनेक वर्षे ते किर्तन,प्रवचनातुन समाजप्रबोधन करत आहेत. पालखी सोहळा, वारकरी संप्रदाय, आळंदी शहरातील विकासासाठी ते कायम सरकार दरबारी प्रयत्न करत असतात. वारकरी संप्रदायाचे अनेक प्रश्न मार्गी लावल्याने विद्या विकास प्रतिष्ठान मार्फत दिला जाणारा खेड तालुका गौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला.

अधिक वाचा  गर्भवतींनी कोरोना लस कधी घ्यावी? 'कोव्हॅक्सिन' सुरक्षित, तज्ज्ञांचा दावा