वडगावशेरी – पूर्व पुणे भागातील पहिले साहसी खेळ असलेले थीम पार्क उद्यान विमाननगर मधील सं.न 227 या ठिकाणी दीड एकरमध्ये उभारण्यात येणार आहे. या उद्यानात नागरिकांना साहसी खेळांसह विविध सुविधांचा लाभ घेता येणार आहे. उद्यानातील विविध कामासाठीची एक कोटीची निविदा प्रक्रिया पार पाडली. या उद्यानाचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे नगरसेविका श्‍वेता गलांडे यांनी सांगितले.

विमाननगर भागाची लोकसंख्या एक लाखापेक्षा जास्त आहे. विमाननगरमध्ये आयटी पार्क आणि कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या जास्त आहे. विमानतळावर अनेक नागरीक येतात. मात्र, या परिसरामध्ये मोठे उद्यान नाही. सध्या, या भागात एकच लहान उद्यान आहे. या उद्यानामध्ये नागरीकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यामुळे परिसरामध्ये मोठे उद्यान असावे, अशी मागणी होती.

अधिक वाचा  विद्यापीठात नवा विक्रम ५ हजार झाडांना ‘क्यूआर कोड’

नागरिकांच्या मागणीनुसार विमाननगर येथील स. नं. 227 या ठिकाणी दीड एकर जागेत थीम पार्क उद्यान उभारण्यात येणार आहे. साहसी खेळा सोबत नागरिकांना व्यायाम करण्यासाठी ओपन जिम येथे असणार आहे. लहान मुलांनी विविध आधुनिक पद्धतीचे खेळणी लावण्यात येणार आहे. या परिसरातील नागरिकांना कला गुण सादर करण्यासाठी ऍम्पी थिएटर तयार करण्यात येणार आहे. माती आणि पेवर ब्लॉकचे जॉगिंग ट्रक, ऑक्‍सिजन पार्क, जैववैविधता, ऍक्‍युप्रेश ट्रॅक, ध्यान केंद्र, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ग्रंथालय, अशी विविध सुविधा या उद्यानात असणार आहे. रेन हार्वेस्टिंगची सुविधा असणारे पूर्व पुण्यातील हे पहिले उद्यान असणार आहे. या उद्यानाची निर्मिती थीमवर करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  नितेश राणेंना पुन्हा झटका, उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला

विमाननगर येथे मोठे उद्यान नसल्याने नागरिकांना इतरत्र जावे लागते. पूर्व पुणे भागातील नागरिकांना साहसी खेळ करण्यासाठी पेशवे उद्यानात जावे लागते. आता, विमाननगरमध्येच उद्यान होत असल्याने साहसी खेळ खेळता येणार आहेत. थीम पार्क उद्यानामुळे या भागाचे महत्त्व अधिक वाढणार आहे. उद्यानातील कामाची निविदा प्रक्रिया झाली आहे. दक्षता कमिटीकडे कामाचा प्रस्ताव आहे. दक्षता कमिटीने मान्यता दिल्यानंतर काम तत्काळ सुरू होईल.
– श्‍वेता गलांडे, नगरसेविका, विमाननगर