आळंदी ( दिनेश कु-हाडे पाटील ) : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा च्या आळंदी शहर अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर बनसोडे यांची फेरनिवड करण्यात आली आहे .भारतीय जनता पार्टी पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते कार्यकर्ता मेळाव्यात प्रदान करण्यात आले .यावेळी भारतीय जनता पक्षाचे किसान आघाडीचे नेते संजय घुंडरे पाटील, भाजप आळंदी शहराध्यक्ष किरण येळवंडे, चाकण शहराध्यक्ष अजय जगनाडे, आळंदी नगरपरिषद गटनेते पांडुरंग वहिले, नगरसेवक सागर भोसले, गणेश राहणे, माऊली भाजपचे कार्याध्यक्ष बंडु नाना काळे,सचिन सोळंकर,आकाश जोशी,आनंद वडगावकर, प्रीतम किरवे,राहुल घोलप,माऊली मुंगसे, सदाशिव साखरे, भागवत काटकर, पांडूरंग ठाकुर,सुजित काशीद, प्रमोद बाफना, विकास पाचुंदे तसेच भाजप कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते .
ज्ञानेश्वर बनसोडे आळंदीतील सामाजिक कार्यात कायम आघाडीवर असणारे युवक कार्यकर्ते आहेत. अनेक वर्षे भारतीय जनता पक्ष संलग्न ओबीसी संघटनेचे आळंदी शहराध्यक्ष म्हणून ते सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ओबीसींच्या अनेक प्रश्न त्यांनी आजपर्यंत धडाडीने सोडवण्याचे काम केले आहे असून त्यांच्या या कामाची दखल घेऊन भाजपाने त्यांच्यावर पुन्हा एकदा ओबीसी आघाडीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. सामान्य कार्यकर्ता म्हणून जिल्ह्यात त्यांची ओळख आहे. राज्यमंत्री बाळा भेगडे,पुणे जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील ,भाजप तालुकाध्यक्ष अतुल देशमुख,आळंदीचे उपनगराध्यक्ष सचिन गिलबिले, नगरसेवक प्रशांत कु-हाडे, नगरसेवक संदीप रासकर, नगरसेवक सागर बोरुंदिया,माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर, माजी नगराध्यक्ष सचिन पाचुंदे, मुक्त पत्रकार दिनेश कु-हाडे पाटील यांनी त्यांचे अभिनंदन व पुढील राजकीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला