आळंदी (दिनेश कुर्‍हाडे ) : आळंदी नगरपालिका माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना आळंदी शहराध्यक्ष रोहिदास तापकीर यांच्या हस्ते मोशी याठिकाणी शिवसेना संपर्क कार्यालयात आयुष्यमान प्रधानमंत्री जनआरोग्य योजना , राष्ट्रीय स्वास्थ्य प्राधिकरण अंतर्गत स्मार्ट कार्डचे वाटप लाभार्थींना करण्यात आले.
आळंदी येथे सुमारे साडेसहा हजार लाभधारक असून, पहिल्या टप्प्यातील स्मार्ट कार्डचे वाटप विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले.
यावेळी शशिकांत मल्हारराव राजे जाधव, ज्येष्ठ नागरिक गणपतराव नवले, शंकर पुरी, पीएमपीएलचे मुख्य अधिकारी संदीप निरवणे, शिवसेनेचे विश्वनाथ नेटके, महादेव पाखरे आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  वर्ध्यात अपघातात 7 लोकांचा जागीच मृत्यू; आमदार रहांगडालेंचा सुपुत्रही मृत्