आळंदी देवाची ( दिनेश कुऱ्हाडे ) : वीर शेव लिंगायत समाज आळंदीमध्ये मोठ्या संख्येने राहत आहे . आळंदी नगरपालिकेने अंत्यविधीसाठी जागा उपलब्ध करून दिलेल्या ठिकाणी बीर शेव लिंगायत समाजाने खर्च करून संरक्षण कंपाऊंड केले होते.परंतु ,काही कारणास्तव संरक्षण कंपाऊंडचे प्रशासनाकडून नुकसान झाले आहे तरी प्रशासनाकडून लवकरात लवकर दुरुस्ती करून घ्यावी . त्याचप्रमाणे घाणीचे साम्राज्य झाल्याने दुर्गंधीच्या त्रासामुळे समाजातील नागरिकांचा अंत्यविधी करण्यासाठी गैरसोय होत आहे .त्यामुळे प्रशासनाकडून स्वच्छता आणि जागेला कंपाऊंड त्वरीत घालण्यात यावे अशी मागणी भाजपा ओबीसी मोर्चा आळंदी शहराध्यक्ष ज्ञानेश्वर बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष वैजयंता उमरगेकर आणि मुख्याधिकारी समीर भूमकर यांना निवेदन देण्यात आले आहे .
यावेळी माधव कोरणुळे,बापुसाहेब चिंचकर,धर्मराज पडशेठ्ठी, बसवेश्वर हवा,एकनाथ भुरे,स्वप्निल पळसकर,शिवानंद पाटिल,ज्ञानेश स्वामी,निसार सय्य्द,वैभव हवा,ज्ञानेश्वर चिंचकर,माऊली जिरवणकर ,संग्राम जिरवणकर,शाम मेनकुदळे आदी उपस्थित होते .
भाजपा ओबीसी मोर्चा च्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात कायमस्वरूपी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी . येण्या – जाण्यासाठी रस्ता करून द्यावा. कचरा काढून चांगल्या प्रकारचा मुरूम टाकण्यात यावा. बीर शेव लिंगायत समाजाच्या अंत्यविधी करण्याचा ठिकाणी असणाऱ्या प्रलंबीत सर्व कामे नगरपरिषद प्रशासनाकडून लवकरात लवकर करण्यात यावी आदी मागणी यावेळी करण्यात आल्या आहेत .

अधिक वाचा  गांधी हत्येचे समर्थन कलाकाराचा वेष घेऊन तुम्ही करु शकत नाही', आव्हाडांचा रोखठोक टोला