पुणे : स्त्रीवादाच्या भाष्यकार, ‘मिळून साऱ्या जणी’च्या संपादक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या विद्या बाळ यांचे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने महिला चळवळीचा आधारस्तंभ निखळल्याची भावना व्यक्त होत आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विद्या बाळ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या ट्विट मध्ये शरद पवार म्हणाले ‘न्याय्य हक्कांपासून वंचित स्त्री-समूहाचे आत्मभान जागं करणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या,लेखिका व संपादक डॉ.विद्या बाळ यांच्या निधनाने भारतीय महिला चळवळीचे खंदे नेतृत्व हरपले.त्यांनी पेटवलेल्या वातींच्या आज लखलखत्या मशाली झालेल्या दिसतात. विद्या बाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली!’

अधिक वाचा  संक्रांतीनिमित्त १ कोटी लोक घालणार सूर्यनमस्कार