नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नथुराम गोडसे हे एकाच विचारधारेवर विश्वास ठेवतात. त्यांचे विचार एकसारखेच आहेत, असे कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सांगितले आहे. तसेच, मोदींमध्ये हे सांगण्याची हिंम्मत नाही की ते गोडसेंवर विश्वास ठेवतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये ‘संविधान वाचवा मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी जनतेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली वायनाडमध्ये संविधान वाचवा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाची सुरुवात वायनाड जिल्ह्यातील कलपेट्टा येथून झाली. दोन किलो मीटरपर्यंत पायी हा मोर्चा काढण्यात आला. राहुल गांधी यांच्यासोबत या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

अधिक वाचा  प्रजासाक्तकदिनी देशात स्फोट घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट