मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भाजप युतीच्या जोरदार चर्चा सुरु असतानाच आज भाजप नेते आशिष शेलार यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. या राजकीय भेटीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. शेलार यांनी कृष्णकुंजवर जाऊन भेट घेतली. काल संध्याकाळी 7 वाजता ही भेट झाल्याची चर्चा आहे.

मनसे 9 फेब्रुवारीला पाकिस्तान आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोर्चा काढत आहे. तसेच नुकत्याच झालेल्या अधिवेशनात मनसेने आपली भूमिका बदललेली आहे. मनसेनं हिंदुत्वाच्या मुद्यावरुन वाटचाल सुरु केल्याने त्यांची भाजपशी जवळीक वाढली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांची गुप्त बैठक झाली होती.

अधिक वाचा  लैंगिक संबधांमुळे आरोग्य सुधारतं का? 10 सोप्या मुद्द्यात जाणून घ्या