कल्याण: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. याबाबत राजू पाटील यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे. कल्याण डोंबिवलीतील विविध नागरिप्रश्न त्यांनी अजित पवारांसमोर मांडले.

२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी. तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघातील येणाऱ्या दिवा शीळ डायघर विभागात टोरंट कंपनीला स्थगिती देण्यात यावी. आणि २७ गावांकरीता येत्या अर्थसंकल्पात विशेष निधी ची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी राजू पाटील यांनी केली.

राजू पाटील हे मनसेचे एकमेव आमदार विधानसभेवर निवडून आले आहेत. ते कल्याण ग्रामीण मतदारसंघातील आमदार आहेत. भाजप-मनसे युतीच्या चर्चा सुरु असताना राजू पाटलांनी अजित पवारांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

अधिक वाचा  वैवाहिक बलात्काराच्या वेदना दुर्लक्षितच; पतीचा जबरदस्तीचा संबंध वैधच