पुणे : पुण्यात अन्न आणि औषधे प्रशासनाने अडीच लाख रुपयांचे 1 हजार 410 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले आहे. बेकायदेशीरपणे विक्री करीत असताना पुणे गुन्हे शाखेने हि कारवाई केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हवालदार गणेश साळुंके यांना पर्वती मधील विष्णु सोसायटीत दुकानात भेसळयुक्त पनीर विकले जात असल्याची माहिती मिळाली होती. हरिकृष्ण मुरलीधर शेट्टी असे दुकानदाराचे नाव असून तो बेरकायदेशी पनीर विक्री करत होता.

सहायक पोलीस निरीक्षक आणि अन्न व औषधे प्रशासनाचे निरीक्षक कुलकर्णी, यांच्या पथकाने दुकानावर मंगळवारी छापा घातला. यात 2 लाख 53 हजार रुप्याचे पनीर जप्त करण्यात आले.

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले