आळंदी ( प्रतिनिधी ) : आपल्या महाराष्ट्रातील सर्व नद्या प्रदूषित झाल्या आहेत. भारतासह चीनसारख्या देशाने आता प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. अशा परिस्थितीत आळंदी देवाची येथील सचिन थोरवे परिवार यांनी आळंदी मरकळ रोड येथे मल्टी टेक मोटर्स ही इलेक्ट्रिक बाईक बाजारात आणली असून, खऱ्या अर्थाने प्रदूषणाला आळा घालण्याचे काम केले आहे , असे मत खेड मतदारसंघाचेआमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी मल्टी टेक मोटर्स इलेक्ट्रिक शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी काढले.
याविषयी बोलताना आमदार मोहिते – पाटील म्हणाले की, ” इलेक्ट्रिक बाईकला पेट्रोल नाही, प्रदूषण नाही, आवाज नाही, किक नाही, गिअर नाही, शिवाय पंधरा रुपयात 100 किमी धावते.अशा या इलेक्ट्रिक बाईकचे दालन आळंदी मरकळ रस्त्यावर आज प्रजासत्ताक दिनी सुरू करून थोरवे परिवाराने खऱ्या अर्थाने प्रदूषणाला आळा घालण्याचे काम केले आहे . प्रदूषणामुळे पृथ्वीचंच काय जगाचं देखील संतुलन बिघडले आहे .जगातील चार पाच राष्ट्र वगळली ,तर चीनसारख्या देशासह भारताने देखील प्रदूषणाची पातळी ओलांडली आहे. भारतातील सर्व नद्या आज मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्या आहेत .
यावेळी ह.भ.प डॉ. नारायण महाराज जाधव, खरेदी-विक्री संघाचे राजाराम लोखंडे, माजी सरपंच कैलास थोरवे, उद्योजक संतोष खोल्लम, मल्टी टेक ई मोटर्सचे सर्वेसर्वा सचिन थोरवे, इतिहासकार डॉ सुरेंद्र पवार, पी.डी.भोसले,आदर्श शिक्षक सर्जेराव बरखडे, दिनेश कुर्‍हाडे पाटिल,शिवाजी पगडे, किरण येळवंडे, संदीप पगडे, शामराव गिलबिले, भगवान लेंघडर, महादेव पाखरे आदींसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांचा भाजपला रामराम; बंडाचे निशाण फडकावले