पुणे : महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पालिकेचे 2020-21 या आर्थिक वर्षाचे 6 हजार 229 कोटींचे अंदाजपत्रक स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांच्याकडे सादर केले. मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे 135 कोटींची वाढ केली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते धीरज घाटे, उपमहापौर, विरोधीपक्ष नेते यावेळी उपस्थित होते.

– सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट आणि सेफ्टी मॅपिंग करणार

– पालिकेच्या आयटीआय विद्यालयात स्किल डेव्हलपमेंट कोर्स राबविणार

– शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे

– शहरात विशेष मुलांच्या शाळा उभारणार

– खासगी शाळांच्या तुलनेत पालिका शाळा विकसित करणार

– पालिका शाळेतील शिक्षणाचा दर्जा आणि गुणवत्ता वाढविण्यावर भर

अधिक वाचा  बाणेर येथून अपहरण झालेला 'डुग्गू' अखेर सापडला

– महापालिकेच्या जागा मोजणीसाठी अत्याधुनिक प्रणाली वापरणार

– मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना विचाराधीन

– पालिकेच्या संगणक प्रणालीचे ऑडिट करणार

– रेन वॉटर हार्वेस्टिंग अनुदान कमी करणार

– 11 समाविष्ट गावांची माहिती भौगोलिक माहिती प्रणाली (GIS)वर उपलब्ध करून देणार

– पालिकेच्या संगणक प्रणालीचे ऑडीट करणार

– बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकास करणार

– कोथरूडमध्ये एक्झिबिशन सेंटर उभारणार

– बाणेरमध्ये नोकरदार महिलांसाठी वसतिगृह बांधणार

– सरकारी कार्यालयाच्या जागेतही चार्जिंग स्टेशन करणार

– नवीन ई-बस व 200 सीएनजी बस घेणार

– मुठा नदीकाठी उन्नत रस्ता प्रस्तावित करणार

– शहरात सलग सायकल ट्रॅक विकसित करणार

अधिक वाचा  आली समीप लग्नघटिका... रोहित-जुईली अडकणार लग्नबंधनात!

– मुलांना वाहतूक जनजागृती करण्यासाठी वाहतूक पार्क उभारणार

– आठ ते दहा मेट्रोचे नवीन मार्ग प्रस्तावित करणार

– भविष्याच्या वाहतुकीच्या अनुषंगाने प्रयत्न करणार

– बीओटीवर दहा उड्डाणपूल सुशोभीकरण करणार

– शासकीय रिकाम्या जागा पार्किंगसाठी वापरता येईल का याचाही विचार करणार

– बीआरटीचा अभ्यास करणार. वेळ आणि जागा वाया जात असल्याने हा अभ्यास करणार. त्यातून दुचाकी सोडता येतील का याचा विचार करण्यात येईल.

– शहरात टू व्हीलरसाठी फ्री वे करणार

– जायका प्रकल्पासाठी 75 कोटींची तरतूद

– कचरा व्यवस्थापनासाठी 585 कोटींची तरतूद

– जागतिक बँकेच्या साहाय्याने कत्तलखाना आधुनिकीकरण

– राजीव गांधी रुग्णालयात एमआरआय प्रकल्प सुरू करणार

अधिक वाचा  शरद पवारांना कोरोनाची लागण; विलिगीकरणात राहून उपचार

– आवास योजनते 10 हजार घरे तयार करणार

– आरोग्यासाठी 326 कोटी

– असा येणार आयुक्तांचा रुपया

– भूजल साठा वाढविण्यावर भर देणार

– मिळकतकर 12 टक्के तर पाणीपट्टीत १५ टक्के वाढ

– पाणी पुरवठा 1200 कोटी, घनकचरा ४५० कोटी, वाहतूक सुधारणा आणि पथसाठी 664 कोटींची तरतूद

– नवीन प्रकल्पना कात्री; जुने प्रकल्पच पूर्ण करण्यावर भर

– अंदाजपत्रकात वाहतूक सुधारणेवर भर

– सहा ते आठ महिन्यानंतर करणार

– महापालिका करणार पुरवणी अंदाजपत्रक

– शहराच्या पायाभूत सुविधांवर भर तसेच उत्पन्न वाढीसाठी नवीन पर्यायांची उभारणीच्या भरवशावर