पुणे : सर्वसामान्य नागरिकांना दामदुपटीसह आर्थिक लाभाचे आमिष दाखवून करोडो रुपयांची फसवणूक करणाऱ्या डी. एस. जी. एम. कंपनीच्या संचालकांना तातडीने अटक करून गुंतवणूकदारांचे पैसे परत करावेत , अशी मागणी भारतीय विकास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सुधाकर पणीकर यांनी पत्रकार परिषदेत केली .
याप्रसंगी अतुल येवले , डॉ.दत्तात्रय खुणे,अनिल पाटील , अजय चव्हाण , रवि नागवडे ,नितीन वाघमारे आदी उपस्थित होते .
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. पणीकर म्हणाले की , “डी.एस.जी.एम कंपनीचे मालक भार्गव पांड्या , महेंद्र पांड्या व त्यांच्या साथीदारांनी नागरिकांना अधिक पैसे मिळतील असे आमिष दाखवून महाराष्ट्रमध्ये अंदाजे 200 करोड रुपयांची फसवणूक केली आहे . सदर कंपनीने गुजरात , सुरत , राजस्थान, महाराष्ट्रासह अन्य राज्यातील गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे . केंद्र सरकारने नर्मदा प्रकल्पाकरिता डी.एस.जी.एम आणि राम पी. व्ही. सी. प्रा.लि. कंपनीला टेंडर दिले आहे .असे भासवून फसवणूक केली आहे .सदर कंपनीचे संचालक पांड्या यांनी काही नागरिकांना धनादेश दिले आहेत . मात्र , ते बँकेत पास झाली नाहीत. फसवणूक झालेल्या लोक आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत , त्यातीलच अशोक चक्रवर्ती ( मुंबई , कांदिवली ) यांना मिळालेला धनादेश परत आल्यामुळे याचा धक्का बसून वारले आहेत . विविध प्रकारची प्रोजेक्ट दाखवून नागरिकांना आकर्षित करून त्यांना कंपनीत शेअर होल्डर करतो असे सांगून आर्थिक गुंतवणूक करावयास भाग पाडले ,असा आरोप डॉ. पणीकर यांनी केला .कंपनीने फसवणूक केल्यासंबंधी देशातील काही भागात गुन्हे दाखल झाले आहेत असेही डॉ. पणीकर यांनी सांगितले .यावेळी गुंतवणूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  सीटीईटी परीक्षावेळी विद्यार्थी-आयोजक जुंपले; बाचाबाची नंतर थेट हाणामारी