राज समर्थक अशी उपाधी मिळाली की अनेकांना आकाश ठेंगणे वाटत असले तरी कायमच मराठी ह्रदयसम्राट राज ठाकरे यांचे निष्ठावान म्हणून कोथरूड पुणे शहरातील किशोर शिंदे यांचे नाव घेतले जाते. पक्षप्रमुख आपल्या अत्यंत जवळ असले तरी याचा कधी अभिमान न बाळगता पक्षादेश आणि पक्षाची भूमिका तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करण्याचे मनसैनिक म्हणून किशोर शिंदे यांची ओळख कोथरुड भागात आहे.

पुणे शहरात सध्या  फक्त  कोथरूड विधानसभा मतदारसंघात  महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही  दुसऱ्या क्रमांकाचे आणि विजयाची जवळ असलेली संघटना राखण्या मध्ये किशोर शिंदे यांचे मोलाचे योगदान आहे. पक्षाने दिलेली जबाबदारी आणि आदेश यालाच आपले सर्वस्व मानत  शिंदे काम करत आहेत.

अधिक वाचा  अल्लू अर्जुनच्या ‘त्या’ दृश्यांवरून ‘पुष्पा’वर बंदीची मागणी!

राजसेवक…….
कोथरूडच्या विकासासाठी अविरत अनेक वर्ष काम केलेल्या कामाची दखल घेऊन आपणच आपुलकीने पुणे महानगरपालिकेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. नागरिकांनी दिलेल्या संधीचे सोने करत, नागरिकाचा आपल्या परीने समाधान करण्याचा कायमच प्रयत्न शिंदे यांचा राहिला आहे. पुणे महानगर पालिकेत सत्ताधारी असतानाही आपल्या मितभाषीपणामुळे माजी नगरसेवक किशोर शिंदे यांची प्रतिमा आजही अबाधित आहे.
एकनिष्ठ……….
आपले दैवत माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वसा आणि ध्येय धोरण सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माजी नगरसेवक किशोर शिंदे आजही अविरत काम करत आहेत. आपले तत्व आणि आपले विचार या या दोन विचारावरच त्यांनी आजपर्यंत वाटचाल केली आहे.पुणे शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक आश्वासक चेहरा आणि निष्ठावान मनसैनिक म्हणून आजही माजी नगरसेवक किशोर शिंदे यांचेच नाव घेतले जाते.

अधिक वाचा  पुण्यातील 'या' बँकेच्या आर्थिक घोटाळ्याची वाढली व्याप्ती, धक्कादायक बाब समोर

जय-पराजय याची चिंता न करता कायमच माननीय राज साहेब ठाकरे यांचे विचार आणि आपले गाठण्यासाठी माजी नगरसेवक किशोर शिंदे अविरतपणे काम करत आहेत. पुणे महानगरपालिकेत संधी मिळाल्यानंतर ही आपल्या पक्षाची निष्ठा कायम ठेवत त्यांनी स्नेह खुंटू दिला नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाल्यानंतर आपल्या खांद्यावर घेतलेला पक्षाचा झेंडा आणि माननीय राज साहेबांचे विचारसरणी सर्व स्तरातील नागरिकांच्या भल्यासाठी कायमच उपयोगी पाडण्याचा रात्रंदिवस प्रयत्न किशोर शिंदे करत आहेत.