पुणे – महापालिका आयुक्तांची बदली होताना, त्यांच्याकडून प्रशासनात केल्या जाणाऱ्या खाते बदलांची परंपरा सौरभ राव यांनीही कायम ठेवली आहे. राव यांनी पदभार सोडण्यापूर्वी पथ विभागाचा पदभार विजय कुलकर्णी यांच्याकडे, तर अनिरुद्ध पावसकर यांच्याकडे पाणीपुरवठा तसेच समान पाणी योजनेचे काम देण्यात आले आहे. कुलकर्णी यांच्याकडील ड्रेनेज तसेच भामा-आसखेड योजना व जायका प्रकल्पाचा अतिरिक्त पदभार प्रवीण गेडाम यांच्याकडे सोपवल्याचे आदेश राव यांनी काढले आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून समान पाणी योजना, जायका योजनेतील वाढीव दरांच्या निविदा, तसेच रद्द करण्यात आलेल्या ‘एचसीएमटीआर’ प्रकल्पांच्या वाढीव दराने आलेल्या आणि नंतर रद्द झालेल्या निविदांमुळे कुलकर्णी आणि पावसकर हे दोन्ही अधिकारी चांगलेच चर्चेत होते. त्यामुळे या बदल्या प्रशासकीय असल्या, तरी त्याबाबत महापालिकेत उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत.

अधिक वाचा  कर्वेनगर DP रस्ता मधोमध रेडिमिक्स प्लान्ट; अपघाताचे प्रमाण वाढले