पुणे : पुणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या बदलीचे आदेश काढण्यात आले असून त्यांच्या जागी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक शेखर गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कोण आहेत शेखर गायकवाड ?

गायकवाड हे मूळचे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील मलठण येथील आहेत. त्यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत १९८४ साली कृषी सेवा वर्ग या पदासाठी निवड झाली होती.
त्यांनी जिल्हा पुनर्विकास अधिकारी कोल्हापूर, मुख्यमंत्री व राज्यमंत्र्यांचे खासगी सचिव, महाराष्ट्र जीवनप्राधिकरणाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. याशिवाय नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगलीचे जिल्हाधिकारी म्हणूनही काम काम पहिले आहे.
मागील वर्षी त्यांनी भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक म्ह्णून पदभार स्वीकारला.
अशी आहे गायकवाड यांची कार्यपद्धती :

अधिक वाचा  पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार 'आप'कडून भगवंत मान केजरीवाल यांचा निर्णय

– मनमिळावू अधिकारी म्हणून प्रशासनात ओळख

– महसूल विभागात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव

-प्रशासनावर नियंत्रण असणारा आणि नियमांवर बोट ठेवून काम करणारा अधिकारी म्हणून दबदबा

प्रशासनाच्या नव्या वाटा पुस्तकाचे लेखक

नवीन आयुक्तांसमोर असणार ही आव्हाने :

-२४ बाय ७ पाणीपुरवठा योजना

-जायका प्रकल्प

– शहरातील अरुंद रस्ते

-वाढते नागरीकरण आणि अपुरी प्रशासन व्यवस्था