हडपसर : सावली फाऊंडेशन व साई फाउंडेशनच्या सहकार्याने राधिका महिला बचत गटाच्या वतीने पुनवडी जत्रेचे आयोजन हडपसर मधील भोसले गार्डन याठिकाणी करण्यात आल्याची माहिती राधिका महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती योगेश टिळेकर, रंजना राजेंद्र कोंडे,  सारिका शशिकांत अहिरे या आयोजकानी दिली.
दिनांक 23 जानेवारी ते 26 जानेवारी असे चार दिवस होत असलेल्या पुनवडी जत्रेचे 23 जाने वारी रोजी उदघाटन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता मामा भरणे, राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, संजय जगताप यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये सकाळी 11 वाजता होणार आहे.
प्रथमच हडपसर मध्ये होत असलेल्या पुनवडी जत्रेमध्ये गृहोपयोगी वस्तू, खाद्यपदार्थ व शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची रेलचेल असणार आहे. हडपसर परिसरातील खवय्यांसाठी  व महिला बचत गटांना व्यवसायाचे एक व्यासपीठ यानिमित्ताने उपलब्ध करून देण्यात आले आहे.
पुनवडी जत्रेमध्ये तीनशे स्टॉल लावण्यात आले असून यानिमित्ताने व्यवसाय करण्याची चांगली सुवर्णसंधी हडपसर व पूर्व भागातील नागरिकांना आहे, तरी ज्यांना येथे स्टॉल बुक करायचे असेल त्यांनी संपर्क साधावा असे आवाहन पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेलचे अध्यक्ष राजेंद्र कोंडे व सामाजिक कार्यकर्ते योगेश टिळेकर यांनी केले असून
अधिक माहितीसाठी 8149253771 / 9850342990 / 7769048429 संपर्क साधावा.
तसेच हडपसर व परिसरातील नागरिक व महिलांनी सहकुटुंब या जत्रेचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले .

अधिक वाचा  विलक्षण प्रेमकहाणी 'पांघरुण' ट्रेलर प्रदर्शित