भारत देशात गेल्या ५०० वर्षात आपल्या हृदयात छत्रपति शिवाजी महाराज ,संभाजी महाराज , बाजीराव पेशवे , अशा अनेक वीरपुत्रांच्या यशोगाथा कित्येक शतकांपासून जतन केल्या आहेत।
अशीच एक पानिपत च्या लढाईची यशोगाथा मोठ्या पद्यावर पाहण्याची पहिली वहीली संधी निर्माण झाली आहे। महाराष्ट्राचे सच्चे देशभक्त मराठा जे पानिपतच्या लढाईत प्राणपणाने लढले ज्यांनी आपली निष्ठा आणि शौर्याची कमाल मर्यादा गाठली अश्या ऐतिहासिक पानिपतच्या मोठ्या लढाईचे चित्रण मोठ्या पद्यावर केले आहे।

प्रत्येक मराठी माणसाला पानिपत है भव्य युद्ध चित्रपट मोठ्या पद्यावर पाहण्याची सुवर्ण संधी मिळाली आहे। ह्या चित्रपटात पानिपत युद्धाचे संपूर्ण चित्रण विषयाच्या प्रत्येक महत्वपूर्ण प्रसंग लक्षात घेऊन फ़क्त २ तास ३० मिनिटांत उलगडून दाखवला आहे।
पानिपत बहुश्रुत पण आत्तापर्यंत कोणीही न दाखवलेले युद्ध हे एक प्रत्येक मराठी पालकाचे व वरिष्ठ नागरिकांचे कर्त्तव्य आहे की ही अव्यक्त गोष्ट आपल्या कुटुंबातील प्रत्येकाला दाखवली पाहिजे। म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की मराठे शौर्यने लढले पण हार झाली ती विश्वासघाताने। त्यामुळे सर्वांनी हा चित्रपट सर्व मुलांना व नातवंडाना हा मराठ्यांचा पराक्रम दाखवला पाहिजे।

अधिक वाचा  गल्लीतली निवडणूक म्हणजे वर्ल्ड कप जिंकला असे नाही; नवाब मलिक यांचा राणेंना टोला

त्याच प्रमाणे भारताच्या चित्रपट इतिहासात दादासाहेब फाल्के महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिली वक्ती होते त्याच प्रमाणे पानिपत युद्धाचे जाहिर प्रदर्शन करण्याचा पहिला वहीला प्रयन्त लंडन निवासित श्री रोहित शेळाटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर ह्यानी केला आहे।
दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर म्हणाले ” सत्कार नेहमी होतात कधी ते अवार्ड स्वरुपात असतात कधी अन्य स्वरुपाने होत असतता। पण जेव्हा सत्कार तुमच्या मातीतून तुमच्या लोकांकडून पवित्र भावनेतून करण्यात येतो त्याला शब्द नसतात। या देशाने आणि महाराष्ट्रा ने जे प्रेम चित्रपट पानिपत ला आणि आम्हाला दिले आहे ते खूपच विशेष आहे।”

अधिक वाचा  सोमवारपासून पुन्हा शाळा सुरु होण्याची शक्यता - वर्षा गायकवाड

दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर यांचा हा प्रामाणिक प्रयन्त पाहता संपूर्ण महाराष्ट्र आणि मराठी बांधवांच्या इच्छे नुसार त्यांचा सत्कार करण्यात आला आहे। आशुतोष गोवारिकर ह्यांना हिंदवी स्वराज महासंघ कडून १२ जानेवारी २०२० रोजी सत्कार करुण मानवंदना देण्यात आली।
१२ जनेवारी रोजी पानिपत च्या तिसऱ्या युद्धाला २६० वर्ष पूर्ण झाले असून , मराठ्यांच्या शौर्या ला ह्या प्रसंगी मानवंदना देण्यात आली। ह्या वेळी पेशवे, मराठे आणि मराठा सरदार यांचे वंशज ह्या समारंभात मोठ्या संख्ये ने उपस्थित होते।