भन्नाट संवाद आणि ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या धम्माल गाण्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढवलेल्या बहुचर्चित ‘आटपाडी नाईट्स’चा भन्नाट ट्रेलर आणि पाठोपाठ चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.यातील ‘पण एक प्रॉब्लेम आहे महाराज, तुमचा रात्रीचा काहीतरी घोळ आहे’ हे वाक्य सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. मायदेश मीडिया आणि सुबोध भावे प्रस्तुत ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन नितिन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे, तर प्रणव रावराणे आणि सायली संजीव यांची जोडी मुख्य भूमिकेत आहे.
टीजर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

‘आटपाडी नाईट्स’ च्या अतिशय भन्नाट असलेल्या ट्रेलर मध्ये असे दिसते की, ज्योतिषाने भविष्यवाणी केल्याप्रमाणे वसंत बापूसाहेब खाटमोडे उर्फ वश्या याचे लग्न एका सुंदर सुलक्षणी मुलीशी जुळले आहे. वश्या आपल्या मित्रांशी गप्पा मारताना म्हणतोय ‘माझ्या बायकोला मी वर्जिन भेटणार हाय वर्जिन, लग्नाआधी तिच्या अंगाला टच सुद्धा करणार नाही’. तर वश्याची प्रिया आपल्या मैत्रीणींना सांगते ‘गडी दिसतो तसा नाही, लय रोमांटीक हाय’. हे सगळं धमाल मस्तीत सुरू असलं तर एक ट्विस्ट येतो तो म्हणजे वश्या एका बंगाली बाबाकडे जाऊन म्हणतोय ‘थोडा उसका प्रॉब्लेम है’. आता वश्याचा प्रॉब्लेम नक्की काय आहे? आणि तो कसा सुटणार? याची उत्कंठा या ट्रेलरमुळे वाढली आहे.
संता आणि हरिप्रिया (सायली संजीव) यांच्यात जबरदस्त ‘जांगडगुत्ता’ जमून आल्याचे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘प्रेमाचा जांगडगुत्ता’ या गाण्यामधून दिसत आहे. चित्रपटाच्या टीजर पाठोपाठ सायली आणि प्रणवचा ‘जांगडगुत्ता’ सोशल मीडियावर वायरल झाला.

अधिक वाचा  भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल; देवस्थान जमीन बनावट दस्तप्रकरणी ३ आरोपी

एका संवेदनशील विषयावर हलक्या फुलक्या अंदाजात भाष्य करणारा ‘आटपाडी नाईट्स’ ची निर्मिती मायदेश मीडिया यांनी केली आहे, या चित्रपटात प्रणव आणि सायली यांच्यासह सुबोध भावे, संजय कुलकर्णी, छाया कदम, समीर खांडेकर, आरती वडगबाळकर, योगेश इरतकर, विठ्ठल काळे, जतिन इनामदार, प्रशांत जाधव, शितल कलापुरे, चैत्राली रोडे, श्वेता परदेशी, बालकलाकार ओम ठाकूर, स्व. विवेक राजेश, डॉ. सुधीर निकम, अनुजा प्रभूकेळुसकर यांच्या भूमिका आहेत.