नगर – जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बीएलओच्या कामातून मुक्‍तता करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निवडणूक शाखेने घेतला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बीएलओ धारकांची कामे करताना जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची मोठी कसरत होत होती.

90 टक्‍के बीएलओ हे प्राथमिक शिक्षक आहेत. विशेषतःमहिला शिक्षकांना याच जास्त त्रास सहन करावा लागतो. शिवाय ही कामे करूनही निवडणूक शाखेच्या नोटीसा तत्सम कारवायांचा ससेमिरा सुरुच असायचा. त्यामुळे त्रस्त झालेल्या शिक्षकांनी समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत या निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला.

जिल्हा शिक्षक समन्वय समितीच्या झेंड्याखाली एकत्र येत सर्व शिक्षकांनी निवडणुकीच्या कामातून सुटका व्हावी यासाठी प्रत्येक तालुक्‍यात आंदोलने सुरु केली होती. या लढ्याला अखेर यश आले आहे. या कामातून सुटका झाल्यामुळे शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

अधिक वाचा  तुमचा मृत्यू केव्हा... आता डोळे सांगणार? संशोधकांचा एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित