representative image

नगर : राज्यातील हौशी कलावंतांच्या नाट्याविष्काराला प्रोत्साहन देणारी, हिंदी-मराठी अभिनेता/अभिनेत्रींच्या उपस्थित पार पडणारी आणि भव्यदिव्य पारितोषिके असलेली अहमदनगर महाकंरडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा अहमदनगरमध्ये 16 ते 19 जानेवारीला होणार आहे. अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट प्रायोजित आणि श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित ही स्पर्धा अहमदनगर शहरातील सावेडीतील माऊली सभागृहात रंगणार आहे. राज्यातील हौशी नाट्य संस्था आणि महाविद्यालयांसाठी ही स्पर्धा खुली असेल, महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी दिली.
श्री. नरेंद्र फिरोदिया म्हणाले, “स्पर्धेचे हे आठवे वर्षे आहे. हिंदी-मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलावंतांचे मार्गदर्शन या स्पर्धेला लाभले आणि लाभत आहे. त्यामुळे नाट्यकलावंतांना या महाकंरडक स्पर्धेची उत्सुकता असते. सिने दिग्दर्शक महेश मांजरेकर, अभिनेता भरत जाधव, अंकुश चौधरी, केदार शिंदे, सिद्धार्थ जाधव, मंगेश कुलकर्णी, श्रीरंग गोडबोले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आदींचा सहभाग या स्पर्धेला लाभला आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून केदार शिंदे, अमित भंडारी, सुजय ढाकणे, विजय पाटकर, किरण याज्ञनोपत्ती, प्रवीण तरटे, हेमांगी कवी, सुनील बर्वे, अश्विन पाटील, राजन ताम्हणे व विकास कदम लाभले आहे. यावर्षी प्रसिद्ध सिने अभिनेत्री मुक्ता बर्वे, दिग्दर्शक विनोद लव्हेकर आणि झी स्टुडिओचे अश्विन पाटील हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.

अधिक वाचा  106 नगरपंचायंती Election: विजयाचा गुलाल कुणाला?; मंत्र्यांसह नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

यावर्षी महाराष्ट्रातून 110 संघांनी प्राथमिक फेरीसाठी एकांकिका सादर केल्या त्यातील 30 एकांकिका अंतिम फेरीसाठी निवडल्या गेल्या त्या पुढीलप्रमाणे –
प्राथमिक फेरीसाठी परीक्षक म्हणून श्रेणिक शिंगवी व अभिजीत दळवी यांनी काम पहिले. दि. 16 ते 19 जानेवारी 2020 दरम्यान अंतिम फेरी होणार आहे.

अहमदनगर महाकंरडकाची वाढती प्रसिद्धची दखल मराठी वाहिन्यांनी यावर्षी घेतली आहे. झी-ग्रुपच्या झी-मराठी आणि झी-युवा या मराठी वाहिन्यांचा यावेळी महाकंरडकात सहयोग असणार आहे. त्यामुळे यावेळीची स्पर्धा अधिकच दर्जेदार आणि कसोटी पाहणारी असेल असे अहमदनगर महाकंरडकाचे स्वप्नील मुनोत यांनी सांगितले. या स्पर्धेसाठी सर्व नियम अहमदनगर महाकंरडक समितीकडे राखीव असणार आहे. मीडिया पाटर्नर म्हणून लेटस्-अप आणि आय लव्ह नगर असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी विवेक जोशी 7276355148, सौरभ कुलकर्णी 9028171441 व अक्षय मुनोत 9860609068 किंवा गगन शिंदे 9175913302यांच्याशी संपर्क साधता येईल.