नवी दिल्ली : रस्ते सुरक्षा समितीवर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायधिश ए. एम. सप्रे यांची निवड केली असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी जाहीर केले. माजी. न्यायाधिश आणि या समितीचे सध्याचे प्रमुख के.एस.पी राधाकृष्ण यांनी या पदावर कार्यरत राहण्यास असमर्थता व्यक्त केल्याने त्यांच्या जागी सप्रे यांची निवड करण्यात आली.

या समितीच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळण्यात काही अडचणी असल्याचे न्यायाधिश (निवृत्त) राधाकृष्णन यांनी 16 ऑक्‍टोबर 2019 रोजी कळवले होते, असे सरन्यायाधिश एस. ए. बोबडे यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले. याबाबत सर्वोच्च न्यालयाला मदत करणारे वकील गौरव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, राधाकृष्णन यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे काम करण्यात असमर्थता व्यक्त केली आहे. त्यांच्या जागी न्या. अभय मनोहर सप्रे यांची निवड करण्यात आली.

अधिक वाचा  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वामी विवेकानंद यांना जयंती निमित्त अभिवादन