नवी दिल्ली : जमवाला चिथावणी दिल्याच्या आरोपावरून अटकेत असलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांना दिल्ली न्यायलायाने जामीन मंजूर केला. त्यांनी दिल्लीत निदर्शने करू नये. तसेच शहरात राहू नये. उपचारासाठी शहरात येताना त्याची कल्पना पोलिसांना द्यावी, अशा अटी टाकण्यात आल्या.

त्याच्या सुटकेसाठी टाकण्यात आलेल्या अटी दिल्ली विधानसभा नजरे समोर ठेवून आझाद यांनी मान्य केला. मात्र त्याला ते नंतर आव्हान देण्याची शक्‍यता आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधिश कामिनी लाऊ यांनी लादलेल्या अटी पुढीलप्रमाणे : तुरुंगातून सुटका झाल्यावर ते 24 तास दिल्लीत राहू शकतील. त्याकाळात त्यांना जामा मशिद, जोरबाग हजरत अली दर्गा, आणि रविदास मंदिरात दर्शन घेता येईल. त्यानंतर त्यांना उत्तर प्रदेशात पोलिस सोडतील.

अधिक वाचा  वारज्यातील वन संस्कृती जतनाचा अभिमानच वाटतो - खासदार चव्हाण

आझाद यांच्यावर अशा स्वरूपाचे गुन्हे याआधी नोंद आहेत. भविष्यातही ते असे गुन्हे करू शकतात, त्यामुळे या अटी घालण्यात आल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले. आझाद यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीत न्यायधिशांनी निदर्शने करण्याच्या अधिकाराचे समर्थन केले.