हडपसर ( पुणे ) : लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या १० व्या लोककल्याण साधना गौरव पुरस्काराचे वितरण व १३व्या लोककल्याण अन्नपूर्णा योजनेचा शुभारंभ होणार आहे.
पुरस्कार सोहळ्याविषयी माहिती देताना लोककल्याण प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ होले यांनी सांगितले, लोककल्याण पुरस्कार प्रदान संत तुकाराम महाराजांचे ११वे वंशज पुंडलिक महाराज मोरे देहुकर यांच्या शुभहस्ते १८ जानेवारी रोजी तुकाई दर्शन, फुरसुंगी, हडपसर,पुणे येथे सांय. ८ वा. होणार आहे.
लोककल्याण राष्ट्र साधना गौरव पुरस्कार हडपसर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव, कला साधना पुरस्कार चला हवा येऊ द्या फेम अर्णव काळकुंद्री, समाज साधना सामाजिक कार्यकर्ते नितीन होले, उद्योग साधना उद्योगपती शिवराज तंगशेट्टी, सहकार साधना सन्मित्र बँकेचे अध्यक्ष सुनिल गायकवाड, ज्ञान साधना मुख्याध्यापिका सुषमा कराळे, धर्म साधना ह.भ.प.राजेश महाराज साबळे, पत्रकारिता साधना अनिल मोरे, मातृ-पितृ साधना गौरव अजिनाथ जायभाय/इंदुमती जायभाय यांना दिला जाणार आहे. सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
लोककल्याण अन्नपूर्णा योजनेच्या १३ व्या लाभार्थी गिता बाबर यांना त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम होईपर्यंत दरमहा किराणा वाटप शुभारंभही यावेळी होणार आहे.
लोककल्याण प्रतिष्ठानच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तीमत्वाना पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो.
अनिल मोरे यांनी विविध साप्ताहिक व दैनिकांमध्ये लिखाण करून वंचित व शोषितांना न्याय मिळवुन दिला आहे, रोखठोक महाराष्ट्र न्युज चॅनल चे सध्या संपादक असून पत्रकारितेतील अतुलनीय कामगिरीबद्दल लोककल्याण “पत्रकारिता साधना” पुरस्काराने गौरविले जाणार आहे.

अधिक वाचा  मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू आणि डॉ. रंगारी यांना पडलेला प्रश्न, मुलांना संस्कार देण्यात चुकतोय का?;