हडपसर : 12 जानेवारी हा राष्ट्रमाता स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊंचा जन्मोत्सव संपूर्ण जगभर साजरा होत असताना भाजपा मुख्य कार्यालय दिल्ली या ठिकाणी लेखक जय भगवान यांचे ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ अशा वादग्रस्त पुस्तकाचे प्रकाशन केले आहे . छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना दंगलग्रस्त आणि हिटलरशाहीचा पुरस्कार करणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्याशी करणे अतिशय निंदनीय बाब असून सदरील पुस्तकावर त्वरित बंदी घालून संबंधित लेखक, प्रकाशक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहकार्य करणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करावे .अन्यथा , लेखक जय भगवान गोयल आणि भाजप कार्यालयाचे भांडारकर करू असा इशारा 5 जाने 2004 रोजी वादग्रस्त लेखक जेम्स लेन लिखित ” द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया ” या वादग्रस्त पुस्तकासंदर्भात भांडारकर संस्थेवर कारवाई करणारे शिवक्रांतिवीर महेश टेळे यांनी दिला असून हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दाखल केली आहे.
उत्तर भारतीय विशेषत: हिंदी भाषिक राज्यातील बहुसंख्य लोकांना केंद्रात भाजप सरकार आल्यापासुन प्रत्येकाला दोन बाप झालेत.बायोलाॅजिकल बापाला ते कोलत असतील मात्र ६ वर्षांपुर्वी मिळालेले पप्पा मोदी हे त्यांच्यासाठीभटगीरी करण्यासाठी देवही झाले असतील ,पण जगाचे दैवत असणाऱ्या विश्ववंदनीय छत्रपती शिवरायांची नरेंद्र मोदींशी केली जाणारी तुलना आम्ही कधीही सहन करणार नाही . अखंड भूतलावर ज्या युग पुरुषांची महाराष्ट्राच्या सर्वस्वाची कुणाशी तुलना होऊ शकत नाही , त्यांची मोदीसारख्या आभाळ हेपल्यासोबत तुलना करून शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या आहेत .धुर्वकरणाचा भाजपामार्फत राष्ट्रीय सेवा संघाचा डाव आम्ही शिवप्रेमी कधी पूर्ण होऊ देणार नाही हे संबंधितांनी सदैव स्मरणात ठेवावे.
भाजपा कार्यालयात प्रकाशित झालेले जय भगवान गोयल याचे पुस्तक आमच्या दैवत असणाऱ्या शिवरायांची बदनामी आणि त्यांचे कर्तव्य झाकण्याचा खोडसाळ प्रयत्न आहे . विचारांची लढाई विचारांनी करावी हा सिद्धांत मांडणाऱ्या विवेकी लोकांनी ज्यांच्या डोक्यात सतत कुविचार आहेत अशा माणसाची छत्रपती शिवरायांशी तुलना करणे हे निषेधार्ह आहे . माफीवीर सावरकरांसाठी टोप्या घालणारे आणि गांधीजींची हत्या करणारा नथुराम गोडसे यांचे समर्थन करणारे शिवरायांच्या बदनामी संदर्भात आता गप्प का आहेत ? हेही त्यांनी या निमित्ताने महाराष्ट्राच्या जनतेला सांगावे . छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकारणासाठी वापर बंद करावा, त्यांची तुलना जगात कोणाशीच होऊ शकत नाही . त्यामुळे लेखक जय भगवान गोयल लिखित ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी ‘ या पुस्तकाशी संबंधित सर्वावर गुन्हे दाखल करावी अशी मागणी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार अर्ज दाखल करून महेश टेळे, उत्तम कामठे ,अनिल बोटे, रमजान शेख, मारुती काळे ,योगेश शिंदे ,उमेश बागल ,सुनील हरपळे, दीपक जाधव ,माऊली चव्हाण यांच्यासह हडपसर व परिसरातील शिवप्रेमी यांनी केली आहे .

अधिक वाचा  कोल्हापूर बालहत्याकांड प्रकरण: आरोपी गावित बहिणींची फाशीची शिक्षा रद्द