अहमदाबाद : जेएनयूमधील हल्ल्याविरोधात देशातील अनेक शहरांमध्ये निदर्शने सुरू आहेत. या सगळ्यांत एबीव्हीपी कार्यकर्त्यांची गुंडगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी एनएसयूआयच्या विद्यार्थ्यांवर जोरदार हल्ला केला आहे.
वृत्तानुसार, जेएनयू प्रकरणावर काँग्रेस प्रणित एनएसयूआयचे कार्यकर्ते शांततेत निदर्शने करीत होते. एनएसयूआयचे कार्यकर्ते एबीव्हीपी कार्यालया जवळ पोहोचताच त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. एनएसयूआयचे सरचिटणीस निखिल सावानी यांना चाकूने भोसकल्याची घटनाही घडली आहे. या हल्ल्यात एनएसयूआय महासचिव यांच्यासह अनेक कार्यकर्ते जखमी झाले.
एनएसयूआयने विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. एनएसयूआय गुजरातमधील अहमदाबादेत शांततेत निषेध नोंदवत असताना भाजप उवा मोर्चाचे अध्यक्ष्य डॉ. रुतविज, आणि एबीव्हीपी अध्यक्ष नरेश देसाई यांनी आंदोलकांवर हल्ला केल्याचा आरोप एनएसयूआयने केले आहे . या हल्ल्यावेळी पोलिसही घटनास्थळी उपस्थित होते.

अधिक वाचा  छेडछाड मुक्त महाराष्ट्र व्हावा अशी अपेक्षा - खा.सुप्रिया सुळे