मुंबई : भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे सरकारने जोरदार दे धक्का दिला आहे. आता फडणवीस काय प्रतिक्रीया देणार याचीच उत्सुकता आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजप सरकारने केलेल्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. आधीच्या भाजप सरकारने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर मागच्या दाराने काही संचालकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. या नियुक्त्या थांबण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाने काही निर्णय आज बैठकीत घेतले. यात मोठा निर्णय म्हणजे माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर शासन नियुक्त संचालक नेमण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आत्तापर्यंत ज्या नियुक्त्या केल्या आहेत, त्याचे पुनर्वलोकन करण्यात येणार आहे.

अधिक वाचा  लग्नाचं आमिष अन कारमध्ये बलात्कार; ८ लाखांची फसवणूकही: आरोपी ताब्यात

पूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळात निवडणुकीद्वारे सदस्य निवडून यायचे. मात्र भाजप सरकारने शासन नियुक्त दोन प्रतिनिधी बाजार समितीवर नेमण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या ताब्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिरकाव करण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाद्वारे भाजपशी संबंधित लोकांची वर्णी लावण्यात आली होती. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने या नियुक्त्या आज रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजप आणि माजी मुख्यमंत्री फडवणीस यांना हा जोरदार धक्का आहे.