हडपसर : ” पुणे तिथे , काय उणे ” असे म्हणत महाराष्ट्राला पुरोगामीत्वाचा वसा आणि वारसा देण्याचे काम पुणे जिल्ह्याने केले आहे . महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर सर्वात कमी आहे .परंतु , पुणे जिल्हा सुद्धा त्याला अपवाद नाही. जिजाऊ – सावित्री यांचा वारसा सांगत असताना जगाला दृष्टी आणि सृष्टी देण्याचे काम सुद्धा स्त्रीशक्तीने केले आहे , त्यामुळे मुलींच्या जन्माचे स्वागत करा असे आवाहन ‘ बेटी बचाओ , बेटी पढाओ ‘ चे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके यांनी केले .
परिवर्तन महिला आधार केंद्राच्या वतीने कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ – सावित्री च्या लेकी पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला . यावेळी ‘ बेटी बचाओ , बेटी पढाओ राष्ट्रीय संयोजक डॉ . राजेंद्र फडके , प्रणेते डॉ. गणेश राख , भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशध्यक्ष विकास रासकर , नगरसेवक मारुती तुपे , परिवर्तन महिला आधार केंद्र संस्थापक शोभा लगड ,मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान सचिव स्वाती महेश टेळे , संभाजी ब्रिगेड पुणे उत्तम कामठे , शिवक्रांतिवीर रमजान शेख , संजय सातव ,जीवन जाधव , सतीश भिसे , मसूद शेख , रतन माळी , सुधाकर राजे , प्रमोद परदेशी , स्वप्नील शिरसागर , सविता हिंगणे ,अनुप गौड आदी व्यासपीठावर उपस्थित होते . यावेळी पुढे बोलताना डॉ . राजेंद्र फडके म्हणाले की , “बेटी बचाव , बेटी पढाव ” असं म्हणत स्त्रियांचे प्रबोधन न करता पुरुषांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे . माणसांच्या आणि महिलांच्या वर्तनाचे जोपर्यंत परिवर्तन होणार नाही , तोपर्यंत मुलींच्या जन्माचे दर वाढणार नाहीत . आज मुली सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत . ज्यांना मुली आहेत ते अतिशय भाग्यवान आहेत . मुली जन्माला येऊन शिकल्या पाहिजे , त्यांचे सबलीकरण , सक्षमीकरण व्हावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझी कन्या भाग्यश्री , सुकन्या अशा योजना सुरु केल्या आहेत . ” बेटी बचाव , बेटी पढाव ” हे अभियान सुरू केल्यामुळे खूप चांगले अनुभव समाजामध्ये निर्माण झाले आहेत .यावेळी भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशध्यक्ष विकास रासकर , डॉ .गणेश राख ,नगरसेवक मारुती तुपे , स्वाती महेश टेळे , मसूद शेख , उत्तम कामठे , रतन माळी यांनी मनोगत व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रस्ताविक परिवर्तन महिला आधार केंद्राच्या संस्थापक शोभा लगड आणि सूत्रसंचालन महेश टेळे व सुजाता गायकवाड यांनी केले .

अधिक वाचा  फर्ग्युसन महाविद्यालयाचा परिसर दारूचा अड्डा;तब्बल ८०० दारुच्या बाटल्या सापडल्या 

*चौकट:*
परिवर्तन महिला आधार केंद्राच्या वतीने सौ .राधा बोरोळे ,सविता राजीवडे ,आशा त्रिभुवन ,शोभा जाधव , गौरी तुकाराम सुर्यवंशी , वर्षा ननावरे आदी कर्तृत्ववान महिलांचा जिजाऊ – सावित्री च्या लेकी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला .