मुंबई – महाराष्ट्रातील राजकारण हे भारतीय राजकारणावर प्रभाव टाकणारे राजकारण आहे. त्यामुळेच महाराष्ट्रातील राजकारणाकडे संपूर्ण भारताचे लक्ष लागलेले असते. राज्यात गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल अतिशय अडखळती झाली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत मनसेला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. त्यामुळे पक्षाला नवी दिशा देण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता संघटनेतील प्रतिकांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, पक्ष्याच्या पुढील वाटचालीच्या दृष्टीने राज ठाकरे हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. त्याचा भाग म्हणून मनसेच्या अधिकृत झेंड्याचा रंग बदण्यात येणार आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी म्हणजे 23 जानेवारीला राज ठाकरे आपल्या पक्षचा झेंडा बदलणार आहे.

अधिक वाचा  पर्रिकर यांचे पुत्र उत्पल यांचा भाजपला रामराम; बंडाचे निशाण फडकावले

या नव्या झेंड्यामध्ये आता भगवा रंग प्रामुख्याने दिसणार आहे. तसेच झेंड्यात शिवरायांची मुद्राही छापली जाणार आहे. त्यामुळे राज ठाकरे येत्या काही दिवसात हिंदुत्वाच्या राजकारणाकडे वळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.