इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांना देश सोडून जाण्यास सरकारने मनाई केली आहे. त्यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप असुन त्या विषयीचे खटले सध्या प्रलंबीत आहेत त्यामुळे 46 वर्षीय मरियम यांना देश सोडण्यास मनाई करण्यात आली आहे.

गेल्या ऑगस्ट मध्येच खुद्द नवाज शरीफ यांचाही नो फ्लाय लिस्ट मध्ये समावेश करण्यात आला आहे. म्हणजेच त्यांनाही सध्या देश सोडून जाण्यास मनाई लागू आहे हाच निर्णय आता त्यांच्या कन्येच्या बाबतीत घेण्यात आला आहे. नवाज शरीफ यांना उपचाराच्या कारणासाठी लंडन मध्ये नेण्यात आले आहे. ते आजारी असल्याने आपल्यालाही लंडन मध्ये जाण्यास अनुमती द्यावी अशी मागणी करणारा अर्ज मरियम यांनी सरकारकडे केला होता पण तो अमान्य करण्यात आला आहे. या संबंधात सरकारी सूत्रांकडून सांगण्यात आले की मरियम यांच्यावर असलेले आर्थिक घोटाळ्याचे आरोप गंभीर आहेत. आणि त्यात सरकारी निधीचा संबंध आहे.

अधिक वाचा  भाजपाकडून नाना पटोले विरोधात पुण्यात पोस्टरबाजी“आपण पुण्यात कधी येताय, ते सांगा…”;

त्यामुळे त्यांना कायद्याने अशी अनुमती देता येत नाही.दरम्यान नवाज शरीफ यांच्या पक्षाने या निर्णयाबद्दल सरकारवर टीका केली आहे. विरोधकांना राजकीयदृष्ट्या बदनाम करण्यासाठी सरकार अशी कृत्ये करीत आहे असा आरोप पीएमएल – एन या पक्षाने केला आहे.