वॉशिंग्टन: अमेरिका आणि चीन लवकरच पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर स्वाक्षऱ्या करणार असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. दोन्ही देशांमध्ये व्यापार कराराबाबत झालेल्या चर्चेअंती अनेक मुद्‌द्‌यांवर एकमत झाल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये बराच काळ चाललेले व्यापारयुध्द संपवण्याच्या दृष्टीने दोन्ही देशांकडून प्रयत्न झाले. त्यानंतर याच महिन्यात पहिल्या टप्प्यासाठीच्या व्यापार करारावर सहमती झाल्याची घोषणा करण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान अमेरिकेने ‘स्पेस फोर्स’ नावाच्या नव्या सैन्यदलाची घोषणा केल्यानंतर अमेरिका ब्रह्मांडाचे रुपांतर रणांगणात करत असल्याची टीका चीनने केली आहे. अमेरिकेच्या या आगामी वाटचालीबाबत चीनने अमेरिकेला इशाराही दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी 2020 च्या राष्ट्रीय संरक्षण कायद्यावर स्वाक्षरी केली. यानुसार अंतराळ ही अमेरिकेच्या सैन्याची नवीन शाखा असणार आहे. याविरोधात चीनबरोबरच रशियानेही चिंता व्यक्‍त केली आहे.

अधिक वाचा  डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य दुरूस्ती करून अहवाल सादर करा: पर्यटनमंत्री ठाकरे